Girls Hostel मॅनेजरने NEET विद्यार्थिनीचा बाथरूममधला Video केला शूट अन् पाठवला होणाऱ्या नवऱ्याला!

Girl Bathing Video Clip Viral : कोचिंग हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काकादेव परिसरात पुन्हा एकदा खळबळजनक घटना घडली आहे. गर्ल्स हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

NEET Student Bathroom Video Clip Viral

NEET Student Bathroom Video Clip Viral

मुंबई तक

05 Jun 2025 (अपडेटेड: 05 Jun 2025, 05:09 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

विद्यार्थीनीचा आंघोळ करतानाच व्हिडीओ काढला अन्..

point

पोलिसांना समजताच आरोपींवर केली मोठी कारवाई

point

व्हिडीओ शूट करून पीडितेला दाखवला, नंतर काय घडलं?

Girl Bathing Video Clip Viral : कोचिंग हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काकादेव परिसरात पुन्हा एकदा खळबळजनक घटना घडली आहे. गर्ल्स हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. येथे NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थीनीचा बाथरूममध्ये आंघोळ करतानाचा व्हिडीओ बनवण्यात आलाय. मॅनेजर आणि कर्मचाऱ्यांनी हा अश्लील व्हिडीओ बनवल्याचा आरोप पीडितेनं केला आहे. 

हे वाचलं का?

व्हिडीओ दाखवून संबंध बनवण्यासाठी दबाव

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित विद्यार्थीनी कानपूरच्या रावतपूर परिसरात एका हॉस्टेलमध्ये राहत होती. हॉस्टेलचा मॅनेजर महफूज अली आणि त्याचे सहकारी कफील अंसारीने गुपचूप विद्यार्थीनीचा आंघोळ करतनाचा व्हिडीओ शूट केला. एक दिवस या आरोपींनी पीडितेला फोनमध्ये हा व्हिडीओ दाखवला आणि धमकी दिली की, संबंध केले नाही, तर व्हिडीओ व्हायरल करू. विद्यार्थीनीने त्यांना नकार दिल्यावरही आरोपींनी तिचा छळ सुरुच ठेवला. त्यांनी मैत्रिणींकडून पीडितेचा नंबर मिळवला आणि तिला व्हिडीओ सेंड केला. त्यानंतर पीडित मुलीने याचा विरोध केला. आरोपींनी पीडितेला ब्लॅकमेल करून 60000 रुपयेही वसूल केले. 

हे ही वाचा >> भरधाव कार बंगल्याला धडकली, 5 जण जागीच ठार, लग्नावरुन येताना काळाचा घाला, नेमकं काय घडलं?

या धक्कादायक घटनेची माहिती पीडित मुलीच्या होणाऱ्या पतीला समजली, त्यानंतर त्याने कुटुंबियांना घडलेला प्रकार सांगितला आणि पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीनं कारवाई करत आरोपी महफूज अली आणि कफील अन्सारीला अटक केली. पोलिसांनी आरोपींचे मोबाईल जप्त केले आहेत. हॉस्टेलमध्ये जवळपास 30 विद्यार्थ्यीनी राहतात. याप्रकरणी रावतपूरचे एसीपी अभिषेक पांडे यांनी म्हटलं की, मुलीच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे.

हे ही वाचा >> भरधाव कार बंगल्याला धडकली, 5 जण जागीच ठार, लग्नावरुन येताना काळाचा घाला, नेमकं काय घडलं?

आरोपींकडे असलेले मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. या आरोपींनी अन्य विद्यार्थींनीचे अश्लील व्हिडीओ बनवले आहेत का, याबाबतही कसून तपास सुरु असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. तीन वर्षांपूर्वी याच परिसरात अशाच प्रकारची धक्कादायक घटना घडली होती. गर्ल्स हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या विद्यार्थींनीचे अश्लील व्हिडीओ बनवण्यात आले होते. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत हॉस्टेलला सील केलं होतं. 

    follow whatsapp