भर चौकात कोयते निघाले, दगड भिरकावले... बीडमध्ये गुन्हेगारांचा हैदोस सुरूच, नवा व्हिडीओ समोर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गाडीचा धक्का आणि हॉर्न वाजवण्यावरून झालेल्या वादातून ही मारहाण झाली. व्हायरल व्हिडिओमध्ये एक व्यक्ती दगडाने हल्ला करताना दिसत आहेत.

Mumbai Tak

मुंबई तक

05 Jun 2025 (अपडेटेड: 05 Jun 2025, 08:53 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

बीडमध्ये गुन्हेगारीची मालिका सुरूच

point

दोन गटांमधील वादाचा नवा व्हिडीओ समोर

point

भर चौकात कोयते काढले, दगड मारले

बीड: बीडमध्ये गुन्हेगारीची मालिका कायम सुरू आहे. राज्याला हादरवून टाकणाऱ्या वेगवेगळ्या घटना समोर आल्यानंतरही अजून प्रशासनाला परिस्थिती नियंत्रणात आणण्यात यश आलेलं दिसत नाही. नुकत्याच एका घटनेत शहरातील अण्णाभाऊ साठे चौकात एक घटना घडली.

हे वाचलं का?

गाडीचा धक्का लागला म्हणून वाद...

गाडीचा धक्का आणि हॉर्न वाजवण्याच्या किरकोळ वादातून चार जणांमध्ये तुंबळ मारहाण झाल्याची घटना घडली. या मारहाणीचा थरारक सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, यामुळे परिसरात काही काळ दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.

व्हिडीओमध्ये काय दिसतंय? 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गाडीचा धक्का आणि हॉर्न वाजवण्यावरून झालेल्या वादातून ही मारहाण झाली. व्हायरल व्हिडिओमध्ये एक व्यक्ती दगडाने हल्ला करताना दिसत आहे, तर दोन जणांच्या हातात कोयत्यासारखी धारदार हत्यारे दिसत आहेत. या घटनेत काही जणांनी एकमेकांवर धारदार शस्त्रांनी वार केल्याचेही सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे.

हे ही वाचा >> सिंधुताई सपकाळांचं नाव, लग्नासाठी रजिस्ट्रेशनच्या नावाने पैसे उकळले, फसवणुकीचं प्रकरण काय?

या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून, या घटनेच्या मुळाशी गेलेल्या कारणांचा शोध घेतला जात आहे. व्हायरल झालेल्या सीसीटीव्ही फुटेजमुळे या प्रकरणाने सोशल मीडियावर मोठी चर्चा निर्माण केली आहे. पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले असून, या प्रकरणात कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत. मात्र, अशा किरकोळ वादांमध्ये भर चौकात असे शस्त्र कसे निघू शकतात, हे शस्त्र सर्रास बाळगले जातात का? या गुन्हेगारांना कुणामुळे अभय मिळालं असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. 

    follow whatsapp