दुसऱ्या धर्मातील मुलावर प्रेम केल्याचा राग, भावाने बहिणीला संपवलं, बाप म्हणाला, 'अशा मुलींना मारणं योग्यच'

मुंबई तक

23 Feb 2026 (अपडेटेड: 23 Feb 2026, 10:11 AM)

Crime News : मिळालेल्या माहितीनुसार, रूपजहां आणि तिच्या घरापासून अवघ्या 400 मीटर अंतरावर राहणारा शिवम सैनी यांचे गेल्या एक वर्षापासून प्रेमसंबंध होते. शिवमच्या कुटुंबाचा या लग्नाला विरोध नव्हता, मात्र रूपजहांचे कुटुंबीय धर्माच्या नावाखाली या नात्याच्या विरोधात होते. दोन महिन्यांपूर्वीच या दोघांनी गुपचूप लग्न केल्याचा दावा शिवमच्या आईने केला आहे.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

दुसऱ्या धर्मातील मुलावर प्रेम केल्याचा राग

point

भावाने बहिणीला संपवलं

point

बाप म्हणाला, 'अशा मुलींना मारणं योग्यच'

Crime News : संभल (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशातल्या संभल जिल्ह्यातील मतावली पट्टी जग्गू गावात सध्या स्मशान शांतता पसरली आहे. 18 वर्षांच्या रूपजहां आणि शिवम सैनी यांच्या अपूर्ण राहिलेल्या लव्हस्टोरीचा अंत रक्ताच्या नात्यांनीच केला आहे. ज्या ओढणीने बहिणीचे रक्षण करायला हवे होते, त्याच ओढणीने भावाने बहिणीचा श्वास रोखला.

हे वाचलं का?

काय आहे नेमकं प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार, रूपजहां आणि तिच्या घरापासून अवघ्या 400 मीटर अंतरावर राहणारा शिवम सैनी यांचे गेल्या एक वर्षापासून प्रेमसंबंध होते. शिवमच्या कुटुंबाचा या लग्नाला विरोध नव्हता, मात्र रूपजहांचे कुटुंबीय धर्माच्या नावाखाली या नात्याच्या विरोधात होते. दोन महिन्यांपूर्वीच या दोघांनी गुपचूप लग्न केल्याचा दावा शिवमच्या आईने केला आहे.

 पोलीस ठाण्यातील पंचायत आणि पैशांचा व्यवहार

बुधवारी रूपजहां आणि शिवम घरातून निघून गेले होते आणि सुरक्षेसाठी पोलीस ठाण्यात पोहोचले होते. तिथे झालेल्या पंचायतीत मुलीने आपण सज्ञान असून शिवमसोबत राहू इच्छिते, असे स्पष्ट सांगितले. मात्र, गावातील सरपंचाने मध्यस्थी करून "प्रकरण मिटवण्यासाठी" ३ लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप मुलीच्या काकांनी केला आहे. त्यापैकी दीड लाख रुपये दिल्यानंतर मुलीला 'सगळं ठीक होईल' असं सांगून घरी परत आणण्यात आले.

हेही वाचा : अक्षता पडायला काहीच तास बाकी होते, दोघींनी संपवलं जीवन, मामाने केला धक्कादायक आरोप

काळजाचा थरकाप उडवणारी रात्र

गुरुवारी रात्री जेव्हा घरातील इतर सदस्य लग्नासाठी बाहेर गेले होते, तेव्हा घरी रूपजहां आणि तिचा भाऊ जाने आलम हे दोघेच होते. रूपजहां पुन्हा शिवमकडे जाण्याचा हट्ट करू लागली, तेव्हा संतापलेल्या जाने आलमने ओढणीने तिचा गळा आवळून तिची हत्या केली. हत्येनंतर त्याने स्वतःच पोलिसांना फोन करून गुन्ह्याची कबुली दिली.

बापाचे क्रूर उद्गार: "इज्जत वाचवण्यासाठी हत्या योग्यच"

जेव्हा पोलीस घटनास्थळी पोहोचले, तेव्हा घराच्या अंगणात रूपजहांचा मृतदेह पडला होता. मुलीच्या मृत्यूचा शोक करण्याऐवजी तिचे वडील नौशे आलम कॅमेऱ्यासमोर म्हणाले, "ती एका हिंदू मुलासोबत पळून गेली होती. गावकरी माझी थट्टा करत होते, माझं रस्त्यावरून चालणं कठीण झालं होतं. आम्ही तिला समजवण्याचा प्रयत्न केला पण ती ऐकली नाही. आम्ही मुसलमान आहोत, ती सैनी मुलाशी लग्न कसं करू शकते? माझ्या मुलाने तिची हत्या केली आणि मला याचा कोणताही पश्चाताप नाही. घरची इज्जत वाचवण्यासाठी अशा मुलीला मारणं योग्यच आहे."

पोलिसांची कारवाई

संभलचे एसपी कृष्ण विष्णोई यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी भाऊ जाने आलम याला अटक करण्यात आली आहे. शिवमच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस आता सरपंच आणि पैशांच्या व्यवहाराच्या कोनाचीही चौकशी करत आहेत.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

अक्षता पडायला काहीच तास बाकी होते, दोघींनी संपवलं जीवन, मामाने केला धक्कादायक आरोप