डाकिण असल्याचा संशय, महिला आणि दोन महिन्याच्या मुलाला पेट्रोल ओतून जाळले; हादरवून टाकणारं प्रकरण

मुंबई तक

• 09:55 AM • 23 Feb 2026

Crime News : झारखंडमधील पश्चिम सिंहभूम जिल्ह्यात अंधश्रद्धेतून माणुसकीला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना घडली आहे. कुमारडुंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कलैया गावात एका महिलेवर 'डाकिण' असल्याचा आरोप करत पेट्रोल ओतून आग लावण्यात आली. या भीषण घटनेत 32 वर्षीय महिला आणि तिच्या अवघ्या दोन महिन्यांच्या निष्पाप बाळाचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. अंधश्रद्धेच्या नावाखाली घडलेल्या या दुहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

डाकिण असल्याचा संशय

point

महिला आणि दोन महिन्याच्या मुलाला पेट्रोल ओतून जाळले

point

हादरवून टाकणारं प्रकरण

Crime News : झारखंडमधील पश्चिम सिंहभूम जिल्ह्यात अंधश्रद्धेतून माणुसकीला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना घडली आहे. कुमारडुंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कलैया गावात एका महिलेवर 'डाकिण' असल्याचा आरोप करत पेट्रोल ओतून आग लावण्यात आली. या भीषण घटनेत 32 वर्षीय महिला आणि तिच्या अवघ्या दोन महिन्यांच्या निष्पाप बाळाचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. अंधश्रद्धेच्या नावाखाली घडलेल्या या दुहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : मित्राच्या नावाने विमा काढला, स्वत:च नॉमिनी बनला, नंतर दारु पाजून मित्राला संपवलं; 'असा' रचला कट

'तुमची बायको डाकिण'

17 फेब्रुवारीच्या रात्री नऊच्या सुमारास कोल्हान सिंकू हे आपली पत्नी ज्योती आणि मुलांसह घरात झोपले होते. तेव्हा गावातीलच एका नातेवाईकाने त्यांना आवाज देऊन बाहेर बोलावले. कोल्हान आणि त्यांची पत्नी अंगणात येताच तिथे आधीच जमा झालेल्या 10-12 जणांच्या जमावाने गोंधळ सुरू केला. ज्योती ही 'डाकिण' असून तिच्यामुळे गावात वाईट गोष्टी होत असल्याचा आरोप जमावाने केला. कोल्हान यांनी सकाळी पंचायत बसवून निर्णय घेऊ अशी विनवणी केली, पण संतापलेल्या जमावाने त्यांचे काहीही ऐकले नाही.

पेट्रोल टाकून आग लावली

क्रूरतेचा कळस गाठत जमावातील एकाने पेट्रोलचा कॅन काढून संपूर्ण कुटुंबावर ओतला आणि माचिस पेटवून त्यांना आग लावून दिली. बघता बघता संपूर्ण कुटुंब आगीच्या लपटोंमध्ये वेढले गेले. कोल्हान सिंकू यांनी कसेबसे तिथून पळ काढला आणि जळणारे कपडे फेकून देत जीव वाचवला. ते मदतीसाठी रात्रीच पोलीस ठाण्यात पोहोचले, मात्र रात्रभर त्यांना अपेक्षित मदत मिळाली नाही. बुधवारी सकाळी त्यांनी पुन्हा पोलीस ठाणे गाठून सर्व आपबिती सांगितली, त्यानंतर हे भीषण हत्याकांड उघडकीस आले.

हे ही वाचा : घराजवळ शौचास बसला होता, घरमालकाने गच्चीवरुन फेकून मारली फरशी, तरुणाचा मृत्यू; मृतदेह रस्त्यावर ठेऊन नागरिकांनी केला रास्ता रोको

मायलेकाचे जळालेले मृतदेह ताब्यात

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मायलेकाचे जळालेले मृतदेह ताब्यात घेऊन पोस्ट मार्टमसाठी पाठवले. प्राथमिक तपासात या गुन्ह्यात सुमारे दहा जणांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले असून, आरोपी एकाच कुटुंबातील असल्याचे समजते. पोलिसांनी काही संशयितांचे जबाब नोंदवले असून आरोपींना पकडण्यासाठी शोधमोहीम सुरू केली आहे. अंधश्रद्धेच्या विळख्यातून घडलेल्या या घटनेने गावातील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.