गर्लफ्रेंडला आलिशान विलामध्ये भेटायला बोलावलं, अन् बॉयफ्रेंडने मित्रांशी संगनमत करुन कट रचला, गुलाबी गोळी देऊन सामुहिक बलात्कार

Crime News : पीडित तरुणी ही बन्नेरघट्टा येथील एका नामांकित खासगी महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या तरुणीची ओळख इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून डिक्सिन नावाच्या तरुणाशी झाली होती. डिक्सिन हा मूळचा पश्चिम बंगालचा रहिवासी असून तो बंगळुरूमध्येच वास्तव्यास होता.

Crime News

Crime News

मुंबई तक

23 Feb 2026 (अपडेटेड: 23 Feb 2026, 02:35 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

गर्लफ्रेंडला आलिशान विलामध्ये भेटायला बोलावलं, अन् बॉयफ्रेंडने मित्रांशी संगनमत करुन कट रचला,

point

गुलाबी गोळी देऊन सामुहिक बलात्कार

Crime News : कर्नाटकची राजधानी असलेल्या बंगळुरू शहरातून माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 19 वर्षीय महाविद्यालयीन तरुणीवर तिच्या प्रियकराने आणि त्याच्या मित्राने गुंगीचे औषध देऊन सामूहिक बलात्कार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. जक्कूर येथील एका खासगी विलामध्ये हा अघोरी प्रकार घडला असून, आरोपींनी पीडितेचा विश्वास संपादन करून तिला आपल्या जाळ्यात ओढले होते. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून, पोलिसांनी याप्रकरणी अमृतहल्ली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून सखोल तपासाला सुरुवात केली आहे.

हे वाचलं का?

पीडित तरुणी ही बन्नेरघट्टा येथील एका नामांकित खासगी महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या तरुणीची ओळख इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून डिक्सिन नावाच्या तरुणाशी झाली होती. डिक्सिन हा मूळचा पश्चिम बंगालचा रहिवासी असून तो बंगळुरूमध्येच वास्तव्यास होता. जानेवारी महिन्यात दोघांमध्ये संवाद सुरू झाला आणि अवघ्या काही दिवसांतच डिक्सिनने तिला प्रपोज केलं होतं. तरुणीनेही त्याच्यावर विश्वास ठेवून प्रेमाचा स्वीकार केला. मात्र, प्रेमाच्या नावाखाली डिक्सिनच्या मनात काहीतरी वेगळेच शिजत होते, याची कल्पना पीडितेला नव्हती.

घटनेच्या दिवशी म्हणजे 14 फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने पीडित तरुणी आपल्या एका मैत्रिणीसोबत रात्री जेवण्यासाठी बाहेर गेली होती. त्याच वेळी डिक्सिनने तिला फोन करून जक्कूर येथील एका खाजगी विलामध्ये भेटण्यासाठी बोलावले. प्रियकरावर विश्वास ठेवून ती तिथे पोहोचली. तिथे काही वेळ गप्पा मारल्यानंतर डिक्सिनने तिला जबरदस्तीने एक गुलाबी रंगाची गोळी खाऊ घातली. ही गोळी खाल्ल्यानंतर काही वेळातच तरुणी बेशुद्ध झाली. ती बेशुद्ध असतानाच डिक्सिन आणि त्याचा मित्र निखिल या दोघांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा पीडितेला शुद्ध आली, तेव्हा तिला आपल्यासोबत घडलेल्या प्रकाराची जाणीव झाली.

या नराधमांनी केवळ तिचे शोषण केले नाही, तर तिला तोंड उघडल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली. आरोपी निखिलने तिला बजावले की, जर तिने या घटनेबद्दल कोणालाही सांगितले तर तिची हत्या केली जाईल. या भीषण प्रसंगामुळे आणि धमकीमुळे पीडिता प्रचंड हादरली होती. काही दिवस ती दहशतीखाली आणि मानसिक धक्क्यात होती. मात्र, नंतर तिने धैर्याने आपल्या कुटुंबाला घडलेला सर्व प्रकार सांगितला. कुटुंबाच्या मदतीने तिने पोलीस ठाणे गाठून आरोपींविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरून सामूहिक बलात्कार आणि धमकावल्याप्रकरणी गुन्हा नोंदवून तपास चक्रे वेगाने फिरवली आहेत.

या संपूर्ण प्रकरणाला आता एक नवे आणि धक्कादायक वळण मिळाले आहे. पोलीस उपायुक्तांनी (DCP) दिलेल्या माहितीनुसार, पीडितेने गुन्हा दाखल करण्यापूर्वीच, 21 फेब्रुवारी रोजी आरोपींनी मल्लेश्वरम पोलीस ठाण्यात पीडित तरुणी आणि तिच्या एका मित्राच्या विरोधात खंडणी मागितल्याचा प्रति-गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे हे प्रकरण आता अधिक गुंतागुंतीचे झाले आहे. पोलीस आता या दोन्ही बाजूंच्या दाव्यांची सत्यता पडताळून पाहत आहेत. एका बाजूला बलात्काराचा गंभीर आरोप आहे, तर दुसऱ्या बाजूला खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तांत्रिक पुरावे, विलातील सीसीटीव्ही फुटेज आणि वैद्यकीय अहवालाच्या आधारे पोलीस या प्रकरणाचा छडा लावण्याचा प्रयत्न करत आहेत.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

पप्पा सगळं तिचंच ऐकतात! बहिणीची शॉलने गळा आवळून केली हत्या, भावानं कसा रचला कट?

    follow whatsapp