मुलाचं लग्न तोंडावर असताना 37 वर्षीय मामी 21 वर्षीय भाच्यासोबत गेली पळून, नवरा आठवणीत झाला वेडा

मुंबई तक

23 Feb 2026 (अपडेटेड: 23 Feb 2026, 07:58 PM)

Viral news : विवाहाची तयारी सुरु असताना काही आठवड्यांपूर्वीच 37 वर्षीय महिला तिच्या 21 वर्षीय भाच्यासोबत पळून गेली होती. या प्रकरणात पतीच्या तक्रारीवरून पोलिसांनी भाच्यासह नऊ जणांविरुद्ध एफआरआय नोंदवला आहे आणि या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. 

Virla News

Virla News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

मामी भाच्यासोबत गेली पळून 

point

नवऱ्याने सर्व नातेवाईकांकडे चौकशी केली

point

पत्नी आणि संबंधित मुलामध्ये 16 वर्षांचा फरक

Viral news : उत्तर प्रदेशातील अलिगडच्या पालीमुकीयामपूर भागातून एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे. एका विवाहाची तयारी सुरु असताना काही आठवड्यांपूर्वीच 37 वर्षीय महिला तिच्या 21 वर्षीय भाच्यासोबत पळून गेली होती. या प्रकरणात पतीच्या तक्रारीवरून पोलिसांनी भाच्यासह नऊ जणांविरुद्ध एफआरआय नोंदवला आहे आणि या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : महिलेला बघून तरुणामध्ये जागा झाला सैतान, चाकूचा धाक दाखवून शरीरसुखाची केली मागणी, एवढ्यावरच न थांबता...

मामी भाच्यासोबत गेली पळून 

पोलिसांच्या म्हणण्यांनुसार, पीडितेनं पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटलं की, त्याची पत्नी 25 जानेवारी रोजी तिच्या आई वडिलांच्या घरी गेली होती. आई वडिलांच्या घरातून परतत असताना, वाटेत तिला तिचा पुतण्या विक्रम भेटला होता. या प्रकरणात असा आरोप आहे की, विक्रमने तिला फूस लावून आपल्यासोबत नेले असता, ती महिला बेपत्ता झाली. 

नवऱ्याने सर्व नातेवाईकांकडे चौकशी केली

पीडितेच्या पतीच्या म्हणण्यांनुसार, पत्नीच्या शोधासाठी त्याने गावकरी, सर्व नातेवाईकांकडे चौकशी केली, परंतु कोणतीही ठोस माहिती मिळाली नाही. त्याने कुटुंबाशी अथवा पुतण्याशी चौकशी केली असता, त्याला धमकी देण्यात आली. नवरा व्यथित होऊन त्याने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणात पोलिसांनी नऊ आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. 

पत्नी आणि संबंधित मुलामध्ये 16 वर्षांचा फरक

पतीने दिलेल्या माहितीनुसार, पत्नी आणि संबंधित मुलामध्ये 16 वर्षांचा फरक आहे. 6 मार्च रोजी त्याच्या मुलाचा विवाह होता आणि कुटुंब लग्नाच्या तयारीतच होते. मंगळसूत्र, चैन, पैंजण आणि अंगठया असे दागिने मुलीच्या कुटुंबियांनी खरेदी केले होते. तसेच ते अंदाजे एक लाख रोख रक्कम घेऊन जात गेले. पतीचा आरोप आहे की, विक्रम हा दागिने घेऊन बायकोला घेऊन पळून गेला.

हे ही वाचा : सासऱ्याने 25 वर्षीय सुनेच्या खोलीत जाऊन केली 'तसली' मागणी, नकार दिल्यावर केलं भयानक कृत्य

या प्रकरण लक्षात घेता, पोलिसांनी मोबाईल नंबरचा तपास केला. नंतर संभाव्य ठिकाणी पाळत ठेवली. महिला आणि संबंधित विक्रमच्या ओळखीच्या लोकांशी संपर्क ठेवण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेत इतर लोकांचा सहभाग असण्याची शक्यता असून पोलीस तपास करत आहे. घरात लग्नसराई सुरु असताना महिलेचं बेपत्ता होणं केवळ सामाजिकच नाहीतर मानसिक दबावही आहे.