Parineeti Chopra Raghav Chadha : …अन् सुरू झाली परिणीती-राघव चड्ढांची प्रेम कहाणी

Parineeti and Raghav: परिणिती आणि राघव चड्ढा यांच्या लग्नाचा दिवस जस जसा जवळ येऊ लागला आहे. तसतते अनेक बातम्या आता येऊ लागल्या आहेत. त्यानिमित्तानेच राघव चड्ढा यांनी परिणिती आणि आपल्या पहिल्या भेटीची आठवण सांगितली आहे.

Parineeti raghav marriage first meeting magical

Parineeti raghav marriage first meeting magical

मुंबई तक

09 Sep 2023 (अपडेटेड: 09 Sep 2023, 02:17 PM)

follow google news

Parineeti and Raghav: परिणिती चोप्रा आणि आम आदमी पक्षाचे नेते राघव चड्ढा (Raghav Chadha) यांच्या चाहत्यांना आता त्यांच्या विवाहाची प्रतिक्षा आहे. या महिन्याच्या अखेरीला त्यांच्या लग्नाचा बार उडणार आहे. परिणिती (parineeti chopra) आणि राघव चड्ढा यांच्या लग्नाची तयारीही जोरदारपणे चालू आहे. माध्यमांबरोबर संवाद साधताना राघव चड्ढा यांनी त्यांची आणि परिणिती चोप्रा यांच्या पहिल्या भेटीचा प्रसंग सांगितला आहे. त्यांनी एका मुलाखतीतही परिणितीविषयी बोलताना म्हणाले होते की, परिणितीसारखी अभिनेत्री माझी जीवनसाथी होत आहे त्यामुळे मी स्वतःला धन्य समजतो. माझ्या आयुष्यात मला मिळालेला सुंदर आशिर्वाद म्हणजे परिणिती असल्याचेही त्यांनी बोलन दाखवले.

हे वाचलं का?

परिणिती मिळालेला आशीर्वाद

राघव चड्ढांना ज्यावेळी त्यांच्या पहिल्या भेटीविषयी आणि तुम्ही परिणितीला भेटला कसं हे विचारल्यानंतर मात्र त्यांनी त्यांच्या पहिल्या भेटीची आठवण सांगितली. ते म्हणाले की, परिणिती बरोबरची ती पहिली भेट म्हणजे अगदी जादूमय होती. त्यावेळी ती भेट झाली असली तरी ती भेट म्हणजे जादूमय होती. ती भेट म्हणजे वेगळा साक्षात्कार होता. त्यामुळे त्या भेटीचे मी देवाकडे मी आभार मानतो. कारण परिणिती ही खरच माझ्यासाठी एक प्रकारे देवाचाच तो आशिर्वाद असल्याचेही त्यांनी सांगितले.

हे ही वाचा >> G20 Summit 2023: कोण आहे ती चिमुकली, जिने अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षांचे केले स्वागत

चाहत्यांची समारंभाकडे डोळे

राघव चड्ढा यांना विचारण्यात आले की, पूर्ण देश तुमच्या विवाह समारंभाकडे डोळे लावून बसला आहेत. त्यावर ते म्हणाले की, मीही देशापेक्षा उत्सुक आहे. 13 मे रोजी त्यांनी दिल्लीच्या कपूरथला हाऊसमध्ये त्यांची मोठ्या जल्लोषात एंगेजमेंट झाली होती. त्या कार्यक्रमाला राजकारणातील दिग्गज आणि बॉलीवूडमधील अनेक कलाकारही उपस्थित होते.

हे ही वाचा >> Lok Sabha election 2024 : भाजपला मिळाला नवा मित्र, कर्नाटकात बदलणार समीकरणं

विवाह समारंभासाठी ‘ही’ हॉटेल्स सज्ज

परिणिती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा विवाहसंमारंभ 17 सप्टेंबरपासून 24 सप्टेंबर चालणार आहे. त्या लग्नात त्यांच्या मेहंदी आणि संगीत कार्यक्रमही ठेवला आहे. या लग्न समारंभाचा कार्यक्रम उदयपूरमधील लीला पॅलेस आणि उदय विलासमध्ये होणार आहे. या लग्नाचे खास आकर्षण असणार आहे ते म्हणजे परिणिती चोप्राची बहीण प्रियांका चोप्रा आणि तिचा नवरा निक जोन्सही उपस्थित राहणार आहे.

    follow whatsapp