“विमानात तुम्हाला कोण वाचवणार?” एक वर्षापूर्वीचं 'ते' विधान ठरलं खरं, भारतीय वैमानिकाचा व्हिडिओ व्हायरल!

मुंबई तक

01 Oct 2026 (अपडेटेड: 01 Oct 2026, 11:46 AM)

विमानात प्रवाशांचे प्राण कोण वाचवते याविषयी भाष्य केल्यानंतर वर्षभरातच, 'फ्लायदुबई'चे भारतीय वैमानिक कॅप्टन स्मित मच्छार यांना विमान प्रवासादरम्यान कॉकपिटमधील एका हिंसक संघर्षाचा सामना करावा लागला.या घटनेनंतर, त्यांनी पूर्वी केलेल्या एका विधानाची पुन्हा एकदा चर्चा होऊ लागली आहे.

Pilot Smit Machchhar Viral Video

Pilot Smit Machchhar Viral Video

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

“विमानात काही घडलं तर कोण वाचवणार?”

point

एक वर्षापूर्वीचं 'ते' विधान ठरलं खरं

point

180 प्रवाशांना वाचवणाऱ्या पायटलचा व्हिडिओ व्हायरल!

Pilot Smit Machchhar Viral Video : दुबईहून तेल अवीवकडे जाणाऱ्या 'फ्लायदुबई' (Flight FZ1073) या विमानामध्ये एक थरारक आणि धक्कादायक घटना घडली आहे. विमानाचे भारतीय वैमानिक कॅप्टन स्मित मच्छार (Smit Machchhar) यांच्यावर त्यांच्याच सह-वैमानिकाने कॉकपिटमध्ये चाकूने हल्ला केला. संशयित दहशतवादी हल्ल्याच्या उद्देशाने सह-वैमानिकाने विमानाचा ताबा घेऊन ते कोसळवण्याचा प्रयत्न केल्याचा संशय इस्रायली अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. या प्राणांतिक संघर्षात गंभीर जखमी होऊनही कॅप्टन स्मित मच्छार यांनी दाखवलेले धैर्य आणि प्रसंगावधान यामुळे विमानातील प्रवाशांचे प्राण वाचले आहेत. या घटनेनंतर स्मित मच्छार यांचे एक वर्षापूर्वीचे विधान सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

हे वाचलं का?

कॉकपिटमधील थरार आणि 33 हजार फूट उंचीवरून  घसरण

प्रत्यक्षदर्शी प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, कॉकपिटमध्ये दोन्ही वैमानिकांमध्ये झटापट सुरू असताना रक्ताचा सडा पडला होता. या संघर्षादरम्यान विमान अवघ्या 30 सेकंदांत 33 हजार फुटांवरून थेट 17 हजार फुटांवर खाली आले. कॅप्टन मच्छार यांनी मदतीसाठी दिलेली आरोळी ऐकून विमानात असलेल्या एका इस्रायली प्रवाशाने (जो व्यवसायाने प्लंबर आहे) तात्काळ कॉकपिटमध्ये धाव घेतली. कोणतेही वैमानिकाचे प्रशिक्षण नसतानाही या प्रवाशाने धैर्याने सह-वैमानिकाला रोखत त्याच्यावर मात केली. त्यानंतर विमानात प्रवास करणाऱ्या इतर रिझर्व्ह वैमानिकांच्या (Reserve Pilots) मदतीने विमानाचे सौदी अरेबियातील ताबुक विमानतळावर सुरक्षित इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.

हे ही वाचा : प्रदीप पुर्णेकरांची हत्या झाली त्यावेळी काय घडलं ? FIR मध्ये नेमकं काय?

1 वर्षापूर्वीच्या पॉडकास्ट मधील वक्तव्य व्हायरल

या भयावह घटनेनंतर कॅप्टन स्मित मच्छार यांची 1 वर्षापूर्वीची (ऑक्टोबर 2025) 'बोनाफाईड बँटर' (Bonafide Banter) या पॉडकास्टवरील मुलाखत पुन्हा चर्चेत आली आहे. सूत्रसंचालक झलक मेहता यांच्याशी बोलताना मच्छार म्हणाले होते, "जेव्हा आपण हजारो फूट उंचावर असतो आणि काही अघटित घडते, तेव्हा आपल्याला कोण वाचवणार? सुदैवाने विमानात एखादा डॉक्टर असू शकतो, पण जर नसेल तर केबिन क्रू (Cabin Crew) हेच प्रशिक्षित असतात. ते सर्जरी करू शकत नसले तरी तुमचे प्राण नक्कीच वाचवू शकतात. अनेकदा लोक केबिन क्रूकडे चुकीच्या नजरेने पाहतात, हे दुर्दैवी आहे. पण जेव्हा परिस्थिती बिघडते, तेव्हाच त्यांची खरी किंमत समजते." आज स्वतःच्या जीवावर बेतलेल्या या प्रसंगात त्यांचे हे उद्गार तंतोतंत खरे ठरल्याचे दिसून येत आहे.

हे ही वाचा : INDIA Meeting : राहुल गांधींसमोरच काँग्रेसच्या भूमिकेवर आक्षेप, उद्धव ठाकरे काय म्हणाले?

जागतिक स्तरावरून स्मित मच्छार यांच्या धैर्याचे कौतुक

हल्ल्यात जखमी झालेल्या कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावर सौदी अरेबियातील ताबुक येथील रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. तर हल्ला करणाऱ्या ओमानाच्या सह-वैमानिकाला सौदी अधिकाऱ्यांनी तात्काळ ताब्यात घेतले आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह अनेक जागतिक नेत्यांनी कॅप्टन स्मित मच्छार यांच्या शौर्याचे कौतुक करत त्यांना 'रिअल हिरो' असे संबोधले आहे.