Shocking Video Viral On Social Media : उत्तर प्रदेशच्या मैनपूरी जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली. भाजपच्या माजी महिला नेत्या सीमा गुप्ता यांचा मुलगा शुभम गुप्ताचा अश्लील व्हिडीओ तुफान व्हायरल झालाय. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शुभमची पत्नी आणि व्हिडीओत दिसणारी महिला, दोघांनी वेगवेगळ्या तक्रारी केल्या आहेत.
ADVERTISEMENT
पत्नीने पतीवर केले गंभीर आरोप..
शुभम गुप्ताची पत्नी शीतलने तिच्या पतीवर गंभीर आरोप केले आहेत. शीतलचं म्हणणं आहे की, शुभम तिचा मानसिक आणि शरीरिक छळ करायचा. शुभमने प्रेयसीला तिच्यासोबत बनवलेले अश्लील व्हिडीओ दाखवायचा आणि नंतर तिला त्रास द्यायचा. शुभम तिला सिगारेटचे चटकेही द्यायचा आणि तिला घरात बंद करून ठेवायचा. इतकच नाही, तर तिला उपाशीही ठेवायचा.
हे ही वाचा >> पोहताना दम भरला, गटांगळ्या खाल्ल्या, चौघांचा तलावात बुडून मृत्यू
शीतलने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलंय, शुभम धमकी द्यायचा की, त्याची आई भाजपची नेता आहे. माझं कोणीच बिघडू शकत नाही. दरम्यान, शीतलने दाखल केलेल्या तक्रारीनुसार,पोलिसांनी शुभम गुप्ता, त्याची आई सीमा गुप्ता आणि अन्य दोन लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
कसा झाला व्हिडीओ व्हायरल?
याप्रकरणी आणखी एक धक्कादायक माहिती समोर आलीय. व्हिडीओ शुभमसोबत दिसणाऱ्या महिलेनंही पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. महिलेनं आरोप केला आहे की, तिचं आणि तिच्या प्रियकराचा अश्लील व्हिडीओ व्हायरल केला गेला आहे. ज्यामुळे तिचा प्रतिमेला धक्का बसला आहे.
हे ही वाचा >> नातेवाईकांचा प्रचंड विरोध! नवऱ्याने पोलीस ठाण्यातच नवरीला लावलं सिंदूर, नेमकं घडलं तरी काय?
या महिलेनं शुभमची पत्नी शीतल गुप्तासह तीन लोकांच्या विरोधात एफआयआर दाखल केला आहे. महिलेनं असाही आरोप केला आहे की, तिचा पहिला प्रियकर नीरज गुप्ता, त्याची पत्नी आणि नीरजची बहिण शीतलने तिचा एक जुना व्हिडीओ व्हायरल केला. बॉयफ्रेंडसोबत असतानाचा हा व्हिडीओ असल्याचं तिनं पोलिसांना सांगितलं.
ADVERTISEMENT
