नात्याला काळीमा! वहिनी घरी एकटी असताना दीराने जबरदस्ती केलं अश्लील कृत्य..राज्यात संतापाची लाट

Woman Molested In Barshi : राज्यात येथील बार्शी येथे एका धक्कादायक घटनेमुळं खळबळ उडाली. नात्याला काळीमा फासणारं एक संतापजनक प्रकरण समोर आलं आहे.

Mumbai Tak

Barshi Crime News

मुंबई तक

• 06:30 PM • 31 Jul 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

महिलेला एकटी पाहून नराधमाने तिच्यावर हल्ला केला

point

पोलिसांनी आरोपीवर केला गुन्हा दाखल

point

त्या ठिकाणी घडलं तरी काय?

Woman Molested In Barshi : राज्यात येथील बार्शी येथे एका धक्कादायक घटनेमुळं खळबळ उडाली. नात्याला काळीमा फासणारं एक संतापजनक प्रकरण समोर आलं आहे. 33 वर्षीय महिलेसोबत तिच्याच दीराने अश्लील चाळे केले. महिला घरी एकटी होती, तेव्हा संधीचा फायदा घेत त्याने तिच्यासोबत छेडछाड केली. पीडितेच्या तक्रारीनुसार आरोपी दीरावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

हे वाचलं का?

याबाबत सविस्तर वृत्त असं की, पीडिता तिच्या पतीसोबत शेती करून कुटुंबाचं उदरनिर्वाह करते. त्यांची मुलं शिक्षणासाठी बाहेर गावी राहतात. ही धक्कादायक घटना 29 जुलै रोजी दुपारी घडली. जेव्हा महिलेचा पती शेतावर गेला होता, तेव्हा ती घरी एकटी होती. याचदरम्यान तिचा दीर संतोष घरात घुसला आणि त्याने तिच्यासोबत घाणेरडं कृत्य केलं.

महिलेला एकटी पाहून हल्ला केला

घरात घुसल्यानंतर आरोपीने महिलेचा हाथ पकडला आणि म्हटलं, 'तू मला आवडतेस'. त्यानंतर तिने महिलेसोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. महिलेनं विरोध केला तेव्हा आरोपीने तिला धमकी देत म्हटलं, गावात तुझी बदनामी करेन. आरोपीने महिलेची छेड काढली आणि तिच्या शरीराला स्पर्ष करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पीडितेनं त्याला विरोध करत स्वत:ला सोडवलं आणि ती पोलीस स्टेशनमध्ये गेली.

हे ही वाचा >> Breaking News: राष्ट्रवादीत मोठी खळबळ! माणिकराव कोकाटेंबाबत 'हा' निर्णय झाला, स्वत: अजित पवारांनीच CM फडणवीसांना सांगितलं तुम्ही...

पोलिसांनी आरोपीवर केला गुन्हा दाखल

घटनेनंतर महिलेनं धाडस दाखवत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. बार्शी तालुका पोलिसांनी आरोपी संतोषच्या विरोधात छेडछाडीचा आणि महिलेला धमकी दिल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी कसून तपास सुरु असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. 

त्या प्रकरणामुळे गावात उडाली खळबळ

या घटनेनंतर गावात मोठी खळबळ उडाली. या धक्कादायक घटनेमुळं लोकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. पोलिसांनी पीडितेलं सुरक्षेचं आणि आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याचं आश्वासन दिलं आहे. 

हे ही वाचा >> विद्यार्थ्यासोबत अर्धनग्न अवस्थेत व्हिडीओ कॉल आणि अश्लील चाळे... आरोपी शिक्षिकेवर पोक्सो अॅक्ट!

    follow whatsapp