मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ झाली आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील फडणवीस सरकारमधील मंत्री हे सातत्याने वादग्रस्त गोष्टींमुळे विरोधकांच्या हातात आयतं कोलीत देत असल्याचं पाहायला मिळालं आहे. या सगळ्याचा परिणाम सरकारच्या प्रतिमेवर होत असल्याने स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रचंड नाराज असल्याचं समजतं आहे. याच दरम्यान, आता मुख्यमंत्र्यांनी एक मोठा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे. ज्यामुळे राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडींना सुरुवात झाली आहे.
ADVERTISEMENT
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे मंत्री माणिकराव कोकाटे हे मागील काही दिवसांपासून सतत वादात सापडत आहेत. माणिकराव कोकाटे हे विधानसभेत रमी खेळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून त्यांच्यावर विरोधकांनी जोरदार टीका केली होती. त्यानंतर त्यांचा राजीनामा घेण्यात यावा अशी सातत्याने मागणी करण्यात यावी. मात्र, आता या सगळ्या प्रकरणी एक मोठा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला असल्याचं समजतं आहे.
विधानसभेत ऑनलाइन रमी खेळणं भोवलं, माणिकराव कोकटेंचं खातं काढून घेणार?
माणिकराव कोकाटे यांचा तात्काळ राजीनामा घेण्यात यावा अशी विरोधकांकडून सातत्याने मागणी सुरू आहे. मात्र, अद्याप तरी यावर कोणतीही कार्यवाही अजित पवार किंवा मुख्यमंत्र्यांकडून झालेली नाही. पण यामुळे सरकारची प्रतिमा खराब होत असल्याचं चर्चा सुरू झाल्याने आता माणिकराव कोकाटेंबाबत एक मोठा निर्णय घेण्यात आला असल्याचं बोललं जात आहे.
हे ही वाचा>> CM फडणवीसांना सलग दुसऱ्या दिवशी माणिकराव कोकाटेंवर लागलं बोलावं, मंत्रिपद धोक्यात?
माणिकराव कोकाटे हे विधानसभेत रमी खेळत असल्याचा एक व्हिडिओ समोर आला होता. तेव्हापासून सरकारवर सर्वच स्तरातून टीकेची झोड उठली होती. अशावेळी आता डॅमेज कंट्रोलसाठी अजित पवारांनी माणिकराव कोकाटे यांच्याकडे असलेलं कृषी खातं काढून त्यांना कमी महत्त्वाचं खातं देण्यात यावं अशा स्वरूपाचं पत्र हे मुख्यमंत्री फडणवीस यांना दिलं आहे.
माणिकराव कोकाटे यांनी आतापर्यंत बऱ्याचदा वादग्रस्त विधानं आणि कृती केल्यामुळे अजित पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत आता त्यांच्या खाते बदलाचा निर्णय घेतला असल्याचं समजतं आहे.
'या' नेत्याला लागणार कृषीमंत्री पदाची लॉटरी?
माणिकराव कोकाटे यांचं कृषी खातं जाणार हे आता जवळजवळ निश्चित असल्याचं समजतं आहे. पण त्यांच्या जागी नवे कृषी मंत्री कोण येणार हे याबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे. याबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार हे त्यांचे अत्यंत निकटवर्तीय असलेल्या दत्तात्रय भरणे यांना कृषी खातं देण्यास अनुकूल असल्याचं समजतं आहे.
हे ही वाचा>> 'सभागृहात रमी खेळणं हे काही...', CM फडणवीसांचं 'हे' विधान कृषीमंत्री कोकाटेंसाठी धोक्याचा इशारा?
तर सध्या दत्तात्रय भरणे यांच्याकडे असलेलं क्रीडा व युवक कल्याण हे खातं माणिकराव कोकाटेंकडे असणार आहे.
धनंजय मुंडेंकडूनही जोरदार लॉबिंग सुरू
दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी देखील मंत्रिमंडळात परतण्यासाठी जोरदार लॉबिंग सुरू केलं असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. माणिकराव कोकाटे हे अडचणीत आल्यानंतर धनंजय मुंडेंनी मंत्रिमंडळात परतण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केल्याचं बोललं जात आहे. काही वेळापूर्वीच धनंजय मुंडे हे सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झाले होते. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या.
संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी धनंजय मुंडे यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले होते. त्यामुळे धनंजय मुडेंना त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. पण आता आपलं पुन्हा राजकीय पुर्नवसन करण्यात यावं यासाठी धनंजय मुंडे हे अधिक प्रयत्नशील आहे. मात्र, धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात सहभागी करून घ्यायचं की नाही याविषयी कोणताही निर्णय झालेला नसल्याचं समजतं आहे.
ADVERTISEMENT
