Govt Jobs : आयटीआय पास उमेदवारांसाठी भारतीय नौदलात कामाची सुवर्णसंधी, नि:शुल्क करा अर्ज; 'ही' आहे शेवटची तारीख

मुंबई तक

31 Mar 2026 (अपडेटेड: 31 Mar 2026, 10:50 AM)

सरकारी अप्रेंटिसची संधी आयटीआय झालेल्या उमेदवारांसाठी चालून आलेली आहे. भारतीय नौदलाच्या नेव्हल शिप रिपेअर यार्डमध्ये आयटीआय पास उमेदवारांसाठी ही संधी चालून आली आहे. यासाठी नेमकी काय प्रक्रिया आहे, जाणून घेऊया.

Govt Jobs

Govt Jobs

Google CTA

बातम्या हायलाइट

point

आयटीआय पास उमेदवारांसाठी भारतीय नौदलात कामाची सुवर्णसंधी

point

नि:शुल्क करा अर्ज

point

'ही' आहे शेवटची तारीख

Govt Jobs : आयटीआय झाल्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अप्रेंटिस. यासाठी अनेक तरुण खाजगी कंपन्यांमध्ये प्रयत्न करत असतात. मात्र अशा अप्रेंटिसची संधी सरकारी आस्थापनांमध्येही असते. अशीच एक सरकारी अप्रेंटिसची संधी आयटीआय झालेल्या उमेदवारांसाठी चालून आलेली आहे. भारतीय नौदलाच्या नेव्हल शिप रिपेअर यार्डमध्ये आयटीआय पास उमेदवारांसाठी ही संधी चालून आली आहे. यासाठी नेमकी काय प्रक्रिया आहे, जाणून घेऊया.

हे वाचलं का?

शैक्षणिक पात्रता

याठिकाणी अंप्रेटिंस करण्यासाठी किमान 50  टक्के गुणांसह 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यासोबतच ६५ टक्के गुणांसह संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.  तसेच 1 जून 2026 रोजी किमान 18 वर्षे वय पूर्ण असणे आवश्यक आहे. एससी आणि एसटी प्रवर्गासाठी 5 वर्षांची सूट देण्यात आली आहे.  विशेष म्हणजे अर्जासाठी कोणतीही फी आकारली जाणार नाहीये. 

हे ही वाचा : हनुमान जयंतीला तयार होतोय खास योग, 'या' चार राशींच्या लोकांचे नशीब पालटणार; पहा, काय घडणार तुमच्या आयुष्यात?

असा करा अर्ज

या अप्रेंटिससाठी पोस्टाने अर्ज करायचा आहे. यासाठीचा पत्ता पुढीलप्रमाणे : The Admiral Superintendent (for Officer-in-Charge ATS), Apprentices Training School, Naval Ship Repair Yard, Naval Base, Kochi – 682004. अर्ज कसा करावा याच्या अधिक माहितीसाठी इंडियन नेव्हीच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

हे ही वाचा : बीड: मध्यस्थी करायला गेला शेजारी अन् भलतंच होऊन बसलं...

या आयटीआय ट्रेडसाठी जागा 

COPA, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, फिटर, मशीनिस्ट, मेकॅनिक मोटर व्हेईकल, रेफ्रिजरेशन अ‍ॅण्ड AC मेकॅनिक, टर्नर, वेल्डर, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, फाउंड्रीमॅन, शीट मेटल वर्कर, ड्राफ्ट्समन सिव्हिल, ड्राफ्ट्समन मेकॅनिकल, सेक्रेटेरियल असिस्टंट, इलेक्ट्रोप्लेटर, प्लंबर, मेकॅनिक डिझेल, टेलर, पेंटर, शिपराइट (वुड) या आयटीआय ट्रेडसाठी हे अर्ज करता येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 एप्रिल 2026 असणार आहे.