क्रीडा क्षेत्रात आवड असलेल्यांना सरकारी नोकरीची मोठी संधी! पगार तर वाचा...

केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळ ( CBIC ) ने हवालदार पदांसाठी क्रीडा उमेदवारांकडून अर्जाची प्रक्रिया सुरू केली आहे.

क्रीडा क्षेत्रात आवड असलेल्यांना सरकारी नोकरीची मोठी संधी!

क्रीडा क्षेत्रात आवड असलेल्यांना सरकारी नोकरीची मोठी संधी!

मुंबई तक

• 02:27 PM • 11 Jul 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

क्रीडा क्षेत्रात आवड असलेल्यांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी

point

CBIC कडून हवालदार पदांसाठी भरती

point

किती मिळेल पगार?

CBIC Recruitment: क्रीडा क्षेत्रात म्हणजेच खेळात उत्तम कामगिरी असलेल्या तरुणांसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळ ( CBIC ) कडून नवी भरती जाहीर करण्यात आली आहे. CBIC ने हवालदार पदांसाठी क्रीडा उमेदवारांकडून अर्जाची प्रक्रिया सुरू केली आहे. खेळासोबतच देशाची सेवा करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी सरकारी नोकरीची ही सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. 

हे वाचलं का?

या भरती अंतर्गत एकूण 15 पदांवर नियुक्त्या केल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार 31 जुलै 2025 पर्यंत अर्ज करू शकतात. उमेदवार cbic.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. 

कोण करू शकतं अर्ज? 

या भरतीमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे भारतातील कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी उत्तीर्ण असल्याचं प्रमाणपत्र असायला हवं. याव्यतिरिक्त, उमेदवारांना राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर कोणत्याही खेळात सहभाग असल्याचा पुरावा द्यावा लागेल. क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या खेळाडूंसाठी ही भरती असणार आहे. 

किती मिळेल पगार? 

हवालदार पदांवर निवड झालेल्या उमेदवाराला 18,000 रुपये ते 56,900 रुपये मासिक वेतन देण्यात येईल. याव्यतिरिक्त, केंद्र सरकारच्या नियमांनुसार त्यांना अन्य भत्ते सुद्धा देण्यात येतील. 

वयोमर्यादा

अर्ज करणाऱ्या उमेदवाराचं किमान वय 18 वर्षे असणं अनिवार्य आहे. तसेच, या भरतीसाठी कमाल वर्योमर्यादा 27 वर्षे निश्चित करण्यात आली आहे. तसेच अर्ज करणाऱ्या एससी (SC) आणि एसटी (ST) प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार, उच्च वयोमर्यादेत 5 वर्षे सूट देण्यात येईल. तसेच OBC प्रवर्गातील उमेदवारांना    3 वर्षे सूट देण्यात येणार आहे. 

कोणत्या खेळात प्राविण्य? 

या भरतीमध्ये कोणत्या खेळांना प्राधान्य देण्यात येणार? हे देखील निश्चित करण्यात आलं आहे. यामध्ये एथलेटिक्स, हॉकी, कबड्डी, बॉक्सिंग, फुटबॉल, टेबल टेनिस, तिरंदाजी, कुस्ती सारख्या खेळांचा समावेश करण्यात आला आहे. उमेदवारांना त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीचा पुरावा द्यावा लागेल.

हे ही वाचा: मुंबईची खबर: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनबाबत सर्वात मोठी अपडेट, BKC ते शिळफाटापर्यंत थेट...

शारीरिक क्षमतेचे निकष

पुरुषांसाठी:

उंची: 157.5 सेमी
छाती: 81 सेमी (फुगवलेली)
फिजिकल टेस्ट: 15 मिनिटांत 1600 मीटर चालणे
30 मिनिटांत 8 किमी सायकलिंग

महिलांसाठी: 

उंची: 152 सेमी
वजन: किमान 48 किलो
फिजिकल टेस्ट: 20 मिनिटांत 1000 मीटर चालणे
25 मिनिटांत 3 किलोमीटर सायकलिंग

हे ही वाचा: रीलसाठी व्हिडीओ काढणं जीवावर बेतलं! स्टंट करताना कार 300 फूट दरीत....

कसा कराल अर्ज? 

1. सर्वप्रथम cbic.gov.in या CBIC च्या अधिकृत वेबसाइटवर जा. 
2. भरतीच्या सेक्शनमध्ये जाऊन हवलदार भरती 2025 ची जाहिरात वाचा
3. पात्रता तपासल्यानंतर अर्ज करण्याचा फॉर्म डाउनलोड करून घ्या.
4. अर्ज योग्यरित्या भरा आणि सर्व आवश्यक कागदपत्रांच्या सेल्फ अटेस्टेड कॉपी जोडा. 
5. शेवटच्या तारखेपूर्वी दिलेल्या पत्त्यावर पाठवा.

    follow whatsapp