Health News : सध्याच्या धकाधकीच्या जीवनात अनेकांना विविध आजांराचा सामना करावा लागतो. गेल्या काही वर्षांमध्ये 30 - 35 वयोगटातील तरुणांमध्ये हर्ट अटॅकचे सर्वाधिक प्रमाण वाढू लागले आहे. काहींचा मृत्यू देखील झाला आहे. याचं कारण म्हणजे ताण तणाव आणि बदलतं जीवनमान होय. या एकूण आजारावर मात करण्यासाठी आपण नेमकं काय केलं पाहिजे. हे जाणून घेऊयात.
हेही वाचा : इथे नवऱ्या मुलाची व्हर्जिनिटी तपासते नवरीची 'काकी', आधी काकीसोबत संबंध अन् नंतर मुलीसोबत लग्न!
ADVERTISEMENT
डॉक्टर सुखविंदर सिंग सिबिया यांनी या आजाराची काही कारणं सांगितली आहेत. त्यांचं म्हणण आहे की, कर्मचारी प्रत्येक आठवड्याला 50 - 55 तास काम करत असतात. यामुळे तणावजन्य परिस्थिती निर्माण होते. याचाच विपरित परिणाम हा शरीरावर होताना दिसतो. शरीरात अॅड्रेनालाईनच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ होते. ज्यावेळी तणावजन्य परिस्थिती निर्माण होते, अशावेळी हृदयाचे ठोके धडधडू लागतात. घाम येतो. रक्तातील ग्रंथीमुळे शरीरातील अॅड्रोनाईस संप्रेरकांमध्ये वाढ निर्माण होते. यामुळे हृदयाच्या धमन्या आकुंचन पावू लागतात.
यामुळे येतो हृदयविकाराचा झटका
आपण समजून घेतलं तर लक्षात येईल की, आपल्या हृदयात तीन धमन्या आहेत. जिथून रक्तवाहिन्या रक्त पुढे वाहून नेण्याचं काम करतात. यामुळे हृदयाला ऑक्सिजनचा पुरवठा होतो. अशावेळी संबंधित धमन्यांमधील एखादा रक्तपुरवठा करणारा मार्ग ब्लॉक झाल्यास रक्त प्रवाहाचा वेग हा कमी होतो. यानंतर रक्तप्रवाह करणाऱ्या धमन्यांचे काही नुकसान झाल्यास हृदयविकाराचा झटका येतो.
अधिक ताण घेणं हे एक हृदयविकाराचे कारण असते. यामुळे हार्मोनच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता असते. अशावेळी हृदय जोराने धडधडू लागते. त्यानंतर रक्तदाब वाढू लागतो. तसेच, आपल्या रक्तातील साखर आणि वाईट कॉलेस्ट्रॉलच्या पातळीत वाढ होईल. यामुळे हृदयविकाराचा झटक्याला रुग्णाला सामोरे जावे लागते.
अधिक तणाव निर्माण झाल्याने हृदयाची नियमितता बिघडू लागते. यामुळे हृदयाच्या डाव्या बाजूला असणाऱ्या कर्णिकेत रक्त गोठलं जाते. ज्यामुळे रक्ताची गाठ तयार होते. ही गाठ हृदयातून मेंदूपर्यंत जाऊन पोहचेल. त्यानंतर स्ट्रोक येण्याची सर्वाधिक शक्यता असते.
हेही वाचा : बकऱ्या चारणाऱ्या आजोबासोबत न्यूड होऊ अश्लील चाळे करणाऱ्या इंजिनिअर तरुणीची आता खरी कहाणी आली समोर!
दरम्यान, ऑफिसला तासन् तास कम्प्युटरवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना थोडा वेळ तरी ब्रेक हवा असतो. कामाचे तास पूर्ण करून वेळेतच काम पूर्ण करा. घरातील अन्न खावे आणि व्यायाम करा. मन प्रसन्न राहण्यासाठी आणि ताण कमी व्हावा यासाठी फिरायला जा. चांगली झोप घ्या. हे सर्व केल्यास हृदयविकारापासून स्वत:चे रक्षण करता येईल.
ADVERTISEMENT
