नवी दिल्ली: राजधानी दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्याजवळ आज (10 नोव्हेंबर) संध्याकाळी 7 वाजेच्या सुमारास अचानक एका कारमध्ये अत्यंत शक्तीशाली आणि भीषण स्फोट झाला. ज्यामुळे संपूर्ण परिसरात एकच गोंधळ उडाला. हा स्फोट इतका शक्तिशाली होता की ज्यामध्ये तब्बल 10 जणांचा जागीच मृत्यू झाला. स्फोटाची तीव्रता एवढी भीषण होती की, अनेक कार आणि गाड्यांच्या अक्षरश: चिंधड्या झाल्या आहेत. या भीषण स्फोटामुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. सध्या या स्फोटानंतर दिल्लीसह अनेक राज्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
स्फोटानंतरचे भीषण Video आले समोर
व्हिडिओमध्ये स्फोटानंतर लोक ओरडताना आणि अनेक लोक घटनेचे चित्रीकरण करताना दिसत आहेत. ज्या कारमध्ये स्फोट झाला ती पूर्णपणे आगीत जळून खाक झाली होती. या स्फोटानंतर लागलेल्या आगीत अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. तसंच जवळ उभ्या असलेल्या अनेक वाहनांचेही प्रचंड नुकसान झाले असून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरले आहेत.
हे ही वाचा>> राजधानी दिल्ली हादरली.. लाल किल्ल्याजवळील भीषण स्फोटात तब्बल 10 जणांचा मृत्यू, मुंबईत हायअलर्ट जारी
लाल किल्ल्याजवळ स्फोट
या भीषण स्फोटामुळे वाहतूक कोंडी झाली असून आणि परिसरात घबराट पसरली आहे. व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे की, अनेक जण या स्फोटानंतर आरडाओरडा करत होते. तर काही जण नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचा सल्ला देत होते. व्हिडिओमध्ये अनेक वाहनांचे नुकसान झाले आणि आजूबाजूचा परिसर धुराने भरलेला दिसत आहे.
हे ही वाचा>> 'मी असा स्फोट उभ्या आयुष्यात कधीच...' दिल्लीत झालेल्या स्फोटाबाबत उपस्थितांनी सांगितला घटनेचा थरार
अनेक वाहनांचे नुकसान
अग्निशमन विभागाला घटनेची माहिती मिळताच चार अग्निशमन गाड्या आणि सहा कॅट्स गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू केले आणि जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलीस सध्या स्फोटाचे कारण तपासत आहेत आणि परिसराला वेढा घालण्यात आला आहे.
ADVERTISEMENT











