Crime News: नवी दिल्ली: पाकिस्तानसाठी गुप्तहेर म्हणून काम करणाऱ्या हरियाणातील युट्यूबर ज्योती मल्होत्रा हिला अटक केल्याने एृकच खळबळ माजली आहे. पहलगामधील दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर यानंतर भारतीय गुप्तहेर आणि सुरक्षा यंत्रणा अलर्टवर आहेत. त्यातूनच आत ज्योती मल्होत्रा हिला पाकिस्तानसाठी गुप्तहेर म्हणून काम करत असल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. सोशल इन्फ्लूएन्सर म्हणून ज्योती मल्होत्राचा वावर होता. युट्यूब इंस्टाग्रामवर तिचे @travelwithjo1 या नावाने सोशल मीडिया अकाउंट आहे. तिने संबंधित सोशल मीडियावर पाकिस्तानातील अनेक व्हिडिओ आणि रिल्स देखील शेअर केले होते. दरम्यान, तिने तिचे अत्यंत मादक अदांमधील काही फोटो आणि व्हिडिओ देखील सोशल मीडियावर शेअर केल आहेत.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : बीडमधला नवा 'आका'.. तरुणाला जनावरासारखं मारणाऱ्या 7 गावगुंडांना पोलिसांनी उचललं!
ज्योती मल्होत्रा निघाली पाकिस्तानची गुप्तहेर
ज्योतीने आपल्या इंस्टाग्रामवर पाकिस्तानशी संबंधित काही व्हिडिओ आणि रिल्स शेअर केले. तसंच ज्योतीने आपल्या एका व्लॉगमध्ये पाकिस्तानबाबत केवळ चांगल्याच गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न केला. यामुळे एक परदेशी एजंट असल्याचा आरोप तिच्यावर करण्यात येत आहे. ज्योतीवर पाकिस्तानबाबत सकारात्मक माहिती देण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती, असाही आरोप करण्यात आला आहे.
पाकिस्तानची हॉट गुप्तहेर, पाहा ज्योती मल्होत्राचे फोटो
ज्योती मल्होत्रावर गुन्हा दाखल
भारत सरकारने पाकिस्तानी कर्मचारी एहसान-उर-रहीम उर्फ दानिश याचा हेरगिरीत सहभागी असल्याची माहती दिली आहे. त्यानंतर त्याला भारत देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, हरियाणाची रहिवासी ज्योती सतत त्याच दानिशच्या संपर्कात अनेकदा दिसली. याचपार्श्वभूमीवर ज्योती मल्होत्रावर भारतीय दंड संहिता 152 कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
हेही वाचा : भारतातील 'इथल्या' महिला करू शकतात 4 लग्न, फिरायला आलेले पर्यटक तर...
ज्योती मल्होत्रावर 2023 मध्ये पाकिस्तान उच्चायोगामार्फत व्हिसाचा वापर करत पाकिस्तानमध्ये जाऊन प्रवास केल्याचा आरोप आहे. ज्योती मल्होत्रा ही पाकिस्तानातील दिनेशच्या संपर्कात आली. त्यानंतर तिचे आणि दानिशचे जवळचे संबंध तयार झाले. गुप्तहेर खात्याने माहिती दिली होती की, अटकेत एकूण सहा जणांचा समावेश आहे. ज्यात ज्योती मल्होत्राचाही समावेश करण्यात आला आहे,
ADVERTISEMENT
