Crime Latest News : उत्तर प्रदेशच्या वाराणसी जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. लग्नाच्या एका आठवड्यानंतर नवविवाहितेची हत्या करण्यात आली. चौबेपूर पोलीस ठाणे परिसरातील छितौनी गावात 43 वर्षीय राजू पालने त्याची 28 वर्षीय पत्नी आरती पालची हत्या केली. राजूने लाठ्या काठ्यांनी हल्ला करत पत्नीची निर्घृण हत्या केली. पत्नीवर फोनवर बोलत असल्याने राजूला तिच्यावर संशय होता, याच कारणास्तव राजूने त्याच्या पत्नीची हत्या केली. या घटनेमुळं संपूर्ण परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, पोलिसांनी या हत्याप्रकरणी आरोपी राजूला अटक केली आहे.
ADVERTISEMENT
शेतात सापडला नवविवाहित तरुणीचा मृतदेह
सूत्रांच्या माहितीनुसार, आरोपी राजू पालने त्याची पत्नी आरतीला फोनवर बोलण्यास बंदी घातली होती. परंतु, पतीचं न ऐकता आरतीने फोनवर बोलणं सुरुच ठेवलं. त्यानंतर राजूने रागाच्या भरात त्याच्या पत्नीवर हल्ला केला. या हल्ल्यात राजूच्या पत्नीचा म्हणजेच आरतीचा मृत्यू झाला. गावतील काही लोकांनी शेतात नवविवाहित तरुणीचा मृतदेह बघितला.
हे ही वाचा >> पाकिस्तानची गुप्तेहर.. 'ती' महिला पोलिसांच्या ताब्यात, कोण आहे ज्योती मल्होत्रा?
त्यानंतर या गावातील लोकांनी तातडीनं पोलिसांनी आणि मृत महिलेच्या पतीला कळवलं. पोलीस जेव्हा घटनास्थळी पोहोचले आणि राजूची चौकशी केली, तेव्हा पोलिसांचा राजूवरचा संशय बळावला. त्यानंतर राजूने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. ज्यामुळे पोलिसांचा संशय आणखी वाढला. परंतु, पोलिसांनी अखेर राजूला अटक केली.
आरोपी राजूचा गुन्हेगारी इतिहास
आरोपी राजू यापूर्वी हत्येच्या गुन्ह्यात जेलमध्ये होता. वर्ष 2017 मध्ये त्याने त्याच्या बहिणीच्या प्रियकराची हत्या केली होती. त्यानंतर त्याला 7 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. नोव्हेंबर 2024 मध्ये तो जेलमधून बाहेर आला. लग्नानंतर राजूचा स्वभाव बदलेल, असं कुटुंबियांना वाटत होतं. त्यामुळे 9 मे 2025 रोजी त्याचं लग्न आरती पाल नावाच्या तरुणीशी झालं. हे राजूचं तिसरं लग्न होतं. त्याच्या पहिल्या दोन्ही पत्नींनी त्याला रागीट स्वभावामुळे सोडलं होतं.
हे ही वाचा >> हनिमूनच्या रात्री नवरा-नवरीत असं काही घडलं की, सकाळी अख्ख्या गावाला कळलं! विषय एकदमच हार्ड!
ADVERTISEMENT
