हनिमूनच्या रात्री नवरा-नवरीत असं काही घडलं की, सकाळी अख्ख्या गावाला कळलं! विषय एकदमच हार्ड!

Groom And Bride Viral News : उत्तर प्रदेशच्या आगरा येथे एक धक्कादायक घटना घडल्याने सर्वांनाच हादरा बसला आहे. लग्नाच्या पहिल्याच रात्री म्हणजे सुहागरातला नवरीने नवऱ्यासाठी दूध आणलं.

Wedding Couple Viral News

Wedding Couple Viral News

मुंबई तक

17 May 2025 (अपडेटेड: 17 May 2025, 06:26 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

नवरीने नवऱ्यासोबत लग्नाच्या पहिल्या रात्री नेमकं काय केलं?

point

सकाळी उठल्यानंतर पाहुण्यांना बसला धक्का

point

लग्नाच्या पहिल्या रात्री घडलं तरी काय ?

Groom And Bride Viral News : उत्तर प्रदेशच्या आगरा येथे एक धक्कादायक घटना घडल्याने सर्वांनाच हादरा बसला आहे. लग्नाच्या पहिल्याच रात्री म्हणजे सुहागरातला नवरीने नवऱ्यासाठी दूध आणलं. पण नवरीने या दूधात अंमली पदार्थ मिसळल्याने मोठा कांड झाला. हे प्रकरण थेट पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचलं आणि संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. या व्यक्तीच्या माध्यमातून हे लग्न ठरलं होतं, त्याचा शोध सुरु आहे. या प्रकरणाचा लवकरच तपास करून योग्य ती कारवाई केली जाईल, असं पोलिसांनी म्हटलं आहे. 

हे वाचलं का?

असा सुरु झाला तो खेळ

हे प्रकरण आगरा येथील एत्मादौलाच्या सीतानगर परिसरातील आहे. एक कुटुंब त्यांच्या लहान मुलाच्या लग्नासाठी मुलगी पाहत होता. याचदरम्यान, त्याची ओळख ट्रान्स यमुना फेस-2 मध्ये राहणाऱ्या जयप्रकाशसोबत झाली. जयप्रकाशने स्वत: वकील असल्याचं सांगितलं आणि म्हटलं, तो एका गरिब कुटुंबातील मुलीला ओळखतो. तसच लग्नाचा पूर्ण खर्चही करणार असल्याचं त्याने सांगितलं. त्याने या कामासाठी 40 हजार रुपये घेतले. 

हे ही वाचा >> बीडमधला नवा 'आका'.. तरुणाला जनावरासारखं मारणाऱ्या 7 गावगुंडांना पोलिसांनी उचललं!

लग्नाच्या आधी आणि नंतर वसुली

जेव्हा पीडित कुटुंबं ठरलेल्या ठिकाणी पोहोचलं, तेव्हा जयप्रकाशने त्यांच्याकडून 80 हजार रुपये घेतले. त्यानंतर मदादेव मंदिरात लग्नसोहळा पार पडला. 6 मे च्या रात्री नवरीने सुहागरातच्या बहाण्याने नवरा आणि त्याच्या कुटुंबियांना अंमली पदार्थ मिसळलेलं दूध पाजलं. त्यानंतर संपूर्ण रात्रभर सर्वजण बेशुद्ध झाले. सकाळी त्यांना जाग आल्यानंतर अलमारीमध्ये असलेले दागिने, सामान आणि 1.30 लाख रुपये गायब झाले होते. त्यानंतर पीडित कुंटुंबियांनी सहा जणांच्या विरोधात तक्रार दाखल केली. 

नवऱ्याने माहिती दिली की, नवरीने ती मिर्झापूरची रहिवाशी असल्याचं सांगितलं होतं. तिचे आई-वडिल तिच्यासोबत नव्हते. जे लोक तिच्यासोबत होते, ते स्वत:ला मामा-मामी असल्याचं सांगत होते. जेव्हा नवरीने मामासोबत बोलणं केलं, तेव्हा तिने कबूल केलं की पैसे घेऊन वकिलाच्या सांगण्यावरून तो मामा बनला होता.

हे ही वाचा >> Indian Army मध्ये बंपर भरती, कोणतीही परीक्षा नाही थेट Interview! पगार तब्बल...

त्याला 10 हजार रुपये देण्याचं ठरलं होतं. परंतु, लग्नानंतर फक्त 500 रुपये मिळाले. दरम्यान, आगरा पोलीस कमिश्नरेट एसीपी हेमंत कुमार यांनी म्हटलं की, नवरी घरातील सर्व सामान घेऊन गेली आहे. याप्रकरणी एत्माददौलामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. अन्य पाच जणांविरोधातही तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

    follow whatsapp