Indian Army Recruitment 2025: आपल्यापैकी अनेकांचं इंडियन आर्मी मध्ये नोकरी करण्याचं स्वप्न असतं. इंडियन आर्मी कडून बंपर भरती जाहीर करण्यात आली आहे. भारतीय सेनेकडून टेक्निकल ग्रॅज्यूएट कोर्स (TGC 142)- जानेवारी 2026 साठी अर्जाची प्रक्रिया 30 एप्रिल 2025 पासून सुरु करण्यात आली आहे. या भरतीसाठी उमेदवार 29 एप्रिल 2025 च्या दुपारी 3:00 वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज भरू शकतात. यासाठी joinindianarmy.nic.in या इंडियन आर्मीच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन फॉर्म भरणं अनिवार्य आहे.
ADVERTISEMENT
टेक्निकल ग्रेजुएट कोर्स (TGC-142) 2026 साठी पात्रता
शैक्षणिक पात्रता
अर्ज करण्यासाठी, उमेदवार अविवाहित पुरुष असले पाहिजेत आणि त्यांच्याकडे B.E./B.Tech पदवी असावी किंवा ते अभियांत्रिकी म्हणजेच इंजीनियरिंगच्या अंतिम वर्षाचे विद्यार्थी असायला हवेत.
वयोमर्यादा
या भरतीसाठी 20 ते 27 वर्षे (2 जानेवारी 1999 ते 1 जानेवारी 2006 दरम्यान जन्मलेले) अशी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. या भरतीमध्ये थेट SSB मुलाखत असेल. यामध्ये लेखी परीक्षा होणार नाही.
यामध्ये यशस्वी झालेल्या उमेदवारांना भारतीय सैन्य अॅकॅडमी, डेहराडून मध्ये प्रशिक्षण प्राप्त करण्यासाठी पाठवण्यात येईल. नंतर त्यांना कायमस्वरूपी कमिशन मिळेल. ही संधी अशा इंजीनियरिंगच्या पदवीधरांसाठी आहे ज्यांना भारतीय सैन्याचा भाग बनून अभिमानाने देशाची सेवा करायची आहे.
हे ही वाचा: बीडमधला नवा 'आका'.. तरुणाला जनावरासारखं मारणाऱ्या 7 गावगुंडांना पोलिसांनी उचललं!
डेहराडूनमध्ये प्रशिक्षण
TGT-142 द्वारे भारतीय सैन्यात निवड झाल्यानंतर, उमेदवारांना विविध प्रमुख कॉर्प्समध्ये कमिशन मिळेल. यामध्ये कॉर्प्स ऑफ इंजिनिअर्स, सिग्नल कॉर्प्स आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि मेकॅनिकल इंजिनिअर्स सारख्या प्रतिष्ठित शाखांचा समावेश आहे. निवडलेल्या उमेदवारांना भारतीय सैन्याचे प्रशिक्षित अधिकारी म्हणून आयएमए (IMA) डेहराडून येथे 12 महिन्यांचे प्रशिक्षण घ्यावे लागेल. यानंतर, त्यांना लेफ्टनंट पदावर कायमस्वरूपी कमिशन मिळेल, ज्यामुळे त्यांना भारतीय सैन्यात कायमस्वरूपी अधिकारी म्हणून सेवा देण्याची संधी मिळेल.
हे ही वाचा: Personal Finance: EMI च्या भीतीमुळे तुम्ही घेत नाही स्वत:चं घर? 'हा' फॉर्म्युला वापरा अन् घ्या हक्काचं घर!
किती असेल पगार?
निवड झालेल्या उमेदवारांना आयएमए (IMA) डेहराडून येथे प्रशिक्षणादरम्यान, 56400 रुपये मासिक वेतन मिळेल. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आणि कमिशनिंग झाल्यानंतर, लेफ्टनंट म्हणून त्यांचा वार्षिक पगार सुमारे 17 ते 18 लाख रुपये असू शकतो. याशिवाय, त्यांना मोफत वैद्यकीय कव्हर, गावी जाण्यासाठी मोफत प्रवास सुविधा, CSD कॅन्टीनचे फायदे आणि निवास व्यवस्था अशा विविध आकर्षक सुविधा देखील प्रदान केल्या जातील. हे सर्व भत्ते आणि सुविधा लष्करी अधिकाऱ्याला त्याच्या कार्यकाळात पूर्णपणे सक्षम ठेवण्यासाठी दिल्या जातात.
ADVERTISEMENT
