इंडिया ITME सोसायटीमार्फत बहुसांस्कृतिक सुविधा केंद्राचे अनावरण

मुंबई तक

• 05:45 PM • 12 Apr 2024

इंडिया इंटरनॅशनल टेक्सटाईल मशिनरी एक्झिबिशन सोसायटी (इंडिया ITME सोसायटी) ही एक ना-नफा/ सेवाभावी सर्वोच्च उद्योग संस्था आहे.

ITME सोसायटीमार्फत बहुसांस्कृतिक सुविधा केंद्राचे अनावरण

ITME सोसायटीमार्फत बहुसांस्कृतिक सुविधा केंद्राचे अनावरण

follow google news

India ITME Society: मुंबई: इंडिया इंटरनॅशनल टेक्सटाईल मशिनरी एक्झिबिशन सोसायटी अर्थात इंडिया ITME सोसायटी ही एक ना-नफा मिळवणारी/ सेवाभावी संस्था असून तिने सांस्कृतिक तसेच कॉर्पोरेट कार्यक्रम आयोजित करण्यासाठी बहुसांस्कृतिक सुविधा केंद्र सुरू करण्याची घोषणा केली आहे. बहुसांस्कृतिक केंद्र हा ITME चा सर्वसमावेशक उपक्रम असून जिथे वेगवेगळ्या जाती-धर्माचे लोक एकत्र येऊन आपली परंपरा, पौराणिक कथा आणि अनुभव शेअर करतील. बहुसांस्कृतिकतेला चालना देण्याच्या उद्देशाने सांस्कृतिक विस्तार आणि त्याची जाणीव व्हावी म्हणून हे केंद्र विविध अॅक्टिविटीज आणि उपक्रमांसाठी/ पुढाकारांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठिकाण म्हणून काम करेल. (india itme society unveils multicultural facility center in mumbai)

हे वाचलं का?

प्रख्यात बॉलीवूड अभिनेत्री सौ. स्मिता जयकर, श्री. दारासिंग खुराना (मिस्टर इंडिया इंटरनॅशनल/ आंतरराष्ट्रीय 2017) आणि स्टँड-अप कॉमेडियन श्री. रोहन गुजराल यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढविली.

ITME च्या कार्यकारी संचालिका सौ. सीमा श्रीवास्तव यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आहे की, “आम्ही समाजासाठी आमच्या केंद्राची दारे उघडण्यास उत्सुक असून केंद्राचा वापर त्यांच्या सांस्कृतिक आणि व्यावसायिक उपक्रमांसाठी करणाऱ्या व्यक्तीगत आणि संस्थांचे स्वागत करतो. आम्हाला असा विश्वास आहे की सांस्कृतिक आणि व्यावसायिक अशा दोन्ही उपक्रमांसाठी किफायतशीर जागा उपलब्ध करून देऊन, आम्ही आपल्या स्थानिक समुदायाच्या समृद्धीसाठी आणि विविध लोकांच्या समूहाशी अर्थपूर्ण संबंध वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतो."

अत्याधुनिक सुविधा आणि सानुकूल रचनेने सुसज्ज अशा या  ITME केंद्राच्या माध्यमातून इव्हेंट आयोजक आणि उपस्थितांना उत्साहपूर्ण अनुभव प्रदान करण्यात येत आहे. जिव्हाळ्याचा/ व्यक्तीगत कार्यक्रम असो किंवा मोठ्या प्रमाणात व्यावसायिक कार्यक्रम आयोजित करणे असो, आयोजक ITME च्या संसाधनांचा वापर करून अभूतपूर्व सोहळ्याचे आयोजन करू शकतात, असं सौ. श्रीवास्तव पुढे म्हणाल्या.

ज्येष्ठ अभिनेत्री सौ. स्मिता जयकर यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले आहे की, “ITME केंद्रामुळे दक्षिण मुंबईला एक वेगळीच ओळख लाभणार आहे. मुंबईच्या या गतिशील भागात कला, संस्कृती, नाट्य प्रदर्शन, कार्यशाळा, पुस्तकांचे लाँच यांसारख्या इतर अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी हे केंद्र अधिक आश्वासक/ सहाय्यकारक वातावरण निर्माण करेल.”

सदर कार्यक्रमादरम्यान ‘द पॉवर ऑफ कर्मयोगा’ चे लेखक श्री गोपीनाथ चंद्र दास, ‘व्हाय डू आय फील सॅड?’च्या लेखिका डॉ. शेफाली बत्रा, ‘इट्स गोइंग टू बी ओके’ च्या लेखिका सौ. मुक्ता वानखेडे यांनी त्यांच्या पुस्तकांचे प्रदर्शन केले.

इंडिया ITME सोसायटीबाबत: 

इंडिया इंटरनॅशनल टेक्सटाईल मशिनरी एक्झिबिशन सोसायटी (इंडिया ITME सोसायटी) ही एक ना-नफा/ सेवाभावी सर्वोच्च उद्योग संस्था आहे. या संस्थेची स्थापना 1980 मध्ये वस्त्रोद्योग अभियांत्रिकी उद्योगाला प्रदर्शन, कार्यक्रम, व्यापार प्रोत्साहन सेवा, शैक्षणिक शिष्यवृत्ती, विद्यार्थी नियुक्ती आणि सल्लामसलत इत्यादींच्या माध्यमातून पाठिंबा देण्यासाठी आणि साहाय्य करण्यासाठी केली गेली. इंडिया ITME सोसायटी ज्ञानाची देवाणघेवाण, तंत्रज्ञान हस्तांतरण सारख्या सुविधा सुलभ करून आणि थेट विदेशी गुंतवणूक व संयुक्त उपक्रम इत्यादींना प्रोत्साहन देऊन देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय वस्त्रोद्योग मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.
 

    follow whatsapp