Jalgaon Crime : जळगावमध्ये माणुसकीला काळिमा फासणारं धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. महापालिकेत कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरवर विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विनयभंग केलेल्या आरोपी हा प्रमुख वैद्यकी अधिकारी होता. त्याचं नाव डॉ. विजय घोलप असे असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. तसेच त्याने केलेल्या या कृत्यावरून त्याला नोकरीवरून निलंबितही करण्यात आले होते.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : देवीचं दर्शनंही घेता आलं नाही! ज्योत आणायला गेला अन् घाटात वाहन झालं पलटी, तरुणाचा मृत्यू आणि 11 जणं...
नेमकं काय घडलं?
पीडित महिलेनं दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी घोलप हे वारंवार अश्लील टीका टिप्पण्या करायचे. तसेच अनेकदा घोलप यांनी डॉक्टरकडे शरीरसंबंघाची मागणी केली होती. या प्रकरणामुळे पीडित महिला त्रस्त झाल्या आणि त्यांनी महापालिकेच्या आयुक्तांकडे तक्रार केली.
महिला डॉक्टरच्या केबिनमध्ये आरोपी घोलप यायचा आणि महिलेला अश्लील टिपण्या करू लागायचा, असा गंभीर आरोप पीडित महिलेनं केला होता. इतकंच नाही,तर त्याने पीडितेला स्वत:च्या केबिनमध्ये बोलावले आणि थेट शरीरसुखाची अनेकदा मागणीही केली होती, असे पीडितेनं गंभीर आरोप केले होते.
पीडितेवर मानसिक दबाव
तक्रार दाखल केल्यानंतर, पीडितेवर प्रचंड मोठ्या प्रमाणात मानसिक दबाव टाकण्यात आला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेच्या घरी अनेक लोक पाठवून तक्रार मागे घेण्यासाठी दबाव आणण्यात आला होता. इतकंच नव्हे तर तक्रार निवारण समितीचे सदस्य असल्याचे भासवून एका महिलेनं पीडितेवर तक्रार मागे घेण्यास भाग पाडल्याचा अनेकदा प्रयत्न केला होता. मात्र, संबंधित समितीशी महिलेचा कोणताही संबंध नसल्याचं समोर आलं.
हे ही वाचा : कोकणातील रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना परतीचा पाऊस झोडपणार, तर इतर विभागात पावसाची स्थिती काय?
प्रकरणाचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी, शहर पोलिसांना डॉ. विजय घोलाप यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल केला, तसेच त्यांना अटकंही करण्यात आली. या धक्कादायक घटनेनं जळगाव महापालिकेच काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
ADVERTISEMENT
