जालना: सावत्र बापाचं अमानुष कृत्य, पैशांच्या वादातून चिमुरड्याचे हात पाय बांधून..

Jalna Crime : जालन्यात मन सून्न करून टाकणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. आर्थिक व्यवहारातून एका चिमुकल्याचे हात पाय बांधून बेदम मारहाण करण्यात आली. या अमानवी कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला.

Jalna crime

Jalna crime

मुंबई तक

• 03:38 PM • 12 Jun 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

पैशांच्या वादातून व्यक्तीकडून चिमुकल्याचे हात-पाय बांधून मारलं

point

व्हिडिओ बनवून पैसे मिळवण्यासाठी अनेकदा दबाव

Jalna Crime : गौरव साळी - आर्थिक व्यवहारातून एका चिमुकल्याचे हात-पाय बांधून बेदम मारहाण करण्यात आली. या अमानवी कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. आरोपीची ओळख अंनिस शेख वजीर पटली आहे. ही घटना पोलिसांना समजताच पोलिसांनी चिमुकल्याला सुरक्षितपणे भीषण परिस्थितीतून बाहेर काढले. संबंधित प्रकार हा शिर्डीत घडल्याने शिर्डीतच हा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी मारहाण करणाऱ्या आरोपीविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : Astrology : सूर्य आणि बुधाच्या युतीने बुधादित्य राजयोगची निर्मिती, 'या' राशींचे भाग्य उजडेल

पैशांच्या वादातून व्यक्तीकडून चिमुकल्याचे हात-पाय बांधून मारलं

माहितीनुसार, व्हायरल झालेल्या व्हिडिओतून चिमुकला रडताना दिसतोय. सावत्र बापच मुलाला बेदम मारहाण करत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी संबंधित प्रकरणात लक्ष घालत घटनेचा पुढील तपास सुरू केला. सुरूवातीला तपासातून समोर आलं की, पीडित मुलगा हा जाफराबाद येथील रहिवाशी होता. 

व्हिडिओ बनवून पैसे मिळवण्यासाठी अनेकदा दबाव

या प्रकरणाचा पोलिसांनी तपास केल्यानंतर समजले की, मुलाच्या आईचा दुसरा नवरा हा पैशांची मागणी करत होता. पैसे न मिळाल्यानंतर त्याने चिमुकल्याला बेदम मारहाण केली. नंतर व्हिडिओ बनवून पैसे मिळवण्यासाठी अनेकदा दबाव देखील आणला होता. पोलिसांनी पीडित मुलाच्या आईला आणि तिच्या दुसऱ्या नवऱ्याला ताब्यात घेत चौकशी केली. 

हे ही वाचा : पुण्यात आंदोलानंतर मुलाखतीत काय म्हणाला अभिजीत दीपके?

पीडिताला बाल कल्याण समितीसमोर हजर करण्यात आले. नंतर आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्याला नातेवाईकांच्या हवाली करण्यात आले. पोलिसांनी पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.