Jalna Suicide : जालन्यात प्रेमप्रकरणातून एका तरुणीने तलावात उडी मारत आत्महत्या केली. या घटनेनं जालन्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. तरुणीला तिच्या प्रियकराने लग्नास नकार दिला. त्यानंतर पीडितेच्याच वडिलांनी तिला मारहाण केली. याच त्रासाला कंटाळून तरुणीने आपल्या वडिलांनी मी आत्महत्या करत असल्याचं सांगितलं आणि थेट तलावात उडी घेतली.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : ऐन दिवाळीत कोल्हापूर-राधानगरी रस्त्यावर भीषण अपघात, भाऊबीजेपूर्वी भावासह बहिणीचा चिरडून मृत्यू
तरुणाचा तरुणीला विवाहास नकार अन्...
संबंधित प्रकरणात तरुणाने मुलीला विवाह करण्यास नकार दिला, हाच राग डोक्यात ठेवत तरुणी घराबाहेर पडली. त्यानंतर तिचा शोध घेण्यात आला असता, तिच्या वडिलांनी तिला घरी जाण्यास सांगितले, पण तिने नकार दिला. त्याचक्षणी वडिलांनी तरुणीला बेदम मारहाण केली. त्यानंतर संतापाच्याभरात तरुणीने घरी येण्यास नकार दिला आणि म्हणाली की मला आत्महत्या करायची. त्यानंतर वडील घटनास्थळावरून निघून गेले. तेव्हाच जालन्यातील मोती तलावात तरुणीने उडी घेत जीवन संपवल्याची घटना आहे.
आत्महत्या केल्याचं कारण समोर
काही वेळानंतर याच तलावाच्या पाण्यावर तरंगत असलेला मृतदेह काही नागरिकांनी पाहिला. नागरिकांनीच चंदनझिरा पोलिसांना बोलावले आणि पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर पोलिसांनी या घटनेचा एकूण तपास केला असता, तरुणीने आत्महत्या केल्याचं कारण समोर आले. याच प्रकरणी आरोपी वडिलांसह संबंधित तरुणाला अटक करण्यात आली आहे.
हे ही वाचा : 'माझ्या पत्नीचे लग्नापूर्वी तीन परपुरुषांसोबत प्रेमसंबंध', पतीचा धक्कादायक आरोप, सासाऱ्याला जावई म्हणाला...
पोलिस संबंधित प्रकरण लक्ष देऊन आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास करत असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनं मोती तलाव परिसर हादरून गेला आहे.
ADVERTISEMENT
