Jyoti Malhotra : हरियाणातील हिसार येथे राहणारी युट्यूबर ज्योती रानी मल्होत्राला हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. यानंतर ज्योती मल्होत्राचे वडील हरीश मल्होत्रा यांनी आजतक या प्रसारमाध्यमाशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच आपल्या लेकीच्या युट्यूब करिअरवर त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.
हेही वाचा : ज्योती मल्होत्राची महिना कमाई किती? तिच्या कृत्याने पोटावर येणार पाय?
ADVERTISEMENT
दरम्यान, ज्योती मल्होत्राचा युट्यूब व्लॉग आहे. अशातच आता तिच्यावर आरोप करण्यात आला की, तिने पाकिस्तानी अधिकाऱ्यांसोबत संबंध ठेवत हेरगिरी केली आहे. तिचे अनेक फोटोही समोर आले आहेत. एवढेच नाहीतर ज्योतीला पाकिस्तानी अधिकाऱ्याने जेवणासाठी आमंत्रित केले होते. त्यादरम्यान त्यांच्यात नेमकी काय चर्चा झाली? तसेच तिच्या सोशल मीडियावरील व्हिडिओमध्ये पाकिस्तानमधील अनेक व्हिडिओ शेअर करण्यात आले आहेत.
या प्रकरणात ज्योतीचे वडील हरीश मल्होत्राने प्रसारमाध्यमाशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितले की, लॉकडाऊनआधी ज्योती ही गुरूग्राम येथे एका खासगी कंपनीत नोकरी करत होती. त्यानंतर तिने नोकरी सोडली आणि ती हिसार येथे आली. ज्योतीने यट्यूबवर व्लॉग बनवनं सुरू केलं. ती अनेक व्हिडिओ अपलोड करू लागली.
तिच्या वडिलांनी आपली लेक ही पाकिस्तानात गेली असल्याचं मान्य केलं आहे. पाकिस्तान जाण्यापूर्वी ज्योतीने व्हिजा घेतला होता. दरम्यान, तिच्या वडिलांनी त्यांच्या घरी पोलीस अधिकारी आल्याची माहिती दिली. गुरूवारी आमच्या घरी काही पोलीस आले होते. त्यांनी काहीही न बोलता घरात घुसत तपास करण्यास सुरुवात केली.
हेही वाचा : Beed : रॉड, कत्ती, बेल्ट, काठीने शिवराजला मारणारे 7 जण कोण? सगळ्या आरोपींची नावं, खळबळजनक माहिती समोर
पोलिसांनी घरात घुसत घराचा व्हिडिओ रेकॉर्ड केले. एका तासानंतर पोलिसांनी ज्योतीला ताब्यात घेतलं आणि पोलीस घेऊन गेले. अशावेळी पोलिसांनी मोबाईल, एक लॅपटॉप, पासबुक, एफडीची कॉपी आणि पासपोर्ट जप्त केले आहेत. ज्योतीच्या वडिलांनी सांगितले की, ज्योतीच्या चौकशीसाठी पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे. तिच्या वडिलांनी सांगितले होते की, ती युट्यूब चॅनेलवर पर्यटनासंबंधित व्हिडिओ शेअर करत असते. मात्र, यातील परिपूर्ण प्रकरण मला माहिती नाही.
ADVERTISEMENT
