Kalwa Hospital :कळवा रुग्णालयात ज्यांना मृत्यूने गाठलं, ‘त्या’ 18 रुग्णांची नावं काय?

विक्रांत चौहान

13 Aug 2023 (अपडेटेड: 13 Aug 2023, 04:01 PM)

ठाणे महापालिकेच्या कळवा रूग्णालयात (kalwa hospital) गेल्या 24 तासाच 18 रूग्णांचा मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली आहे.आता या प्रकरणात रूग्णालयात मृत पावलेल्या रूग्णांची नावे समोर आली आहेत. ही नावे कोणती आहेत? हे जाणून घेऊयात.

kalwa hospital 18 patient death names cm eknath shinde formed inquiry commitee

kalwa hospital 18 patient death names cm eknath shinde formed inquiry commitee

follow google news

Chhatrapati Shivaji Maharaj Hospital Kalwa : ठाणे महापालिकेच्या कळवा रूग्णालयात (kalwa hospital) गेल्या 24 तासाच 18 रूग्णांचा मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली आहे.या घटनेनंतर संताप व्यक्त होत असून महापालिका रूग्णालयाच्या कारभारावर ताषेरे ओढण्यात येत आहे. या घटनेचे पडसाद राजकीय वर्तुळातही उमटले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन चौकशी समिती गठीत करण्याचे आदेश देत 48 तासात अहवाल मागविला आहे.आता या प्रकरणात रूग्णालयात मृत पावलेल्या रूग्णांची नावे समोर आली आहेत. ही नावे कोणती आहेत? हे जाणून घेऊयात. (kalwa hospital 18 patient death names cm eknath shinde formed inquiry commitee)

हे वाचलं का?

मृतांची नावे

1) अनोळखी (गीता)
2) झयादा शेख (60)
3)सुनीता रावजी इंदुरकर (70)
4) ताराबाई हरी गागे (56)
5) भानुमती प्रभाकर पाधी (83)
6)सानदी सबीरा मोह. हसन (66)
7) नीनाद रमेश लोकूर (52)
8) भास्कर भीमराव चाबुल स्वर (33)
9) अमरीन अब्दुलकलाम अन्सारी (33)
10) अशोक जयस्वाल (53)
11) भगवान दामू पोतदार (65)
12) अब्दुल रहिम खान (58)
13) सुनील तुकाराम पाटील (55)
14) ललीताबाई शंकर चव्हाण (42)
15) चेतन सुनील गोडे (4)
16) अशोक बाळकृष्ण निचल (81)
17) नुर जहान खान (60)
18) कल्पना जयराम हुमाने (65)

हे ही वाचा : Sharad Pawar Ajit Pawar Meet: शरद पवार अजित पवारांचे मनोमिलन होणार? दिले संकेत

रुग्णालय प्रशासनाचा खुलासा

कळवा रूग्णालयात 18 रुग्णांचा मृत्यू कसा झाला? याचा खुलासा रुग्णालय प्रशासनाने पत्रकार परीषद घेऊन केला आहे. “काल रात्री रुग्णालयात 18 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी 6 रुग्ण असे होते की, जे 24 तासांच्या आत गेलेले आहेत. म्हणजे काही लोक पाऊण तासात. काही लोक अर्ध्या तासात. यातील 5 रुग्ण असे होते की, ज्यांना ताप आणि दम लागणे म्हणजेच फुफ्फुसात संसर्ग झालेला होता. एकाच उदाहरण देतो, बाकी सगळे त्याच प्रकारचे होते. एका रुग्णाच्या प्लेटलेट्स 6000 होत्या.”

“अत्यावस्थ रुग्ण येतात. आल्या आल्या आम्ही त्यांना बघितलं, पण रुग्ण दगावला. असे अजून चार रुग्ण आहेत. एक रुग्ण अशी होती जिचा अल्सर फुटलेला होता. ती रुग्ण इतकी अत्यवस्थ होती की, पाच मिनिटं उशीर झाला असता, तर रुग्णालयात यायच्या आधीच मृत्यू झाला असता. तिला आयव्ही देऊन हार्ट चालू केलं. पण, तिचा मृत्यू झाला”, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

हे ही वाचा : ‘घरी एकटी असली की भाऊ करतो बलात्कार, आई म्हणते ‘गप्प रहा’; पीडितेची वेदनादायक कहाणी

“एक रुग्ण असा होता की ज्याने रॉकेल (केरोसिन) पिलेलं होतं. चार वर्षाचा मुलगा होता. भरपूर केरोसिन पिऊन आलेला होता. नाही वाचवू शकलो. मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये एकाला साप चावलेला होता. यात काही रुग्ण चार दिवसांपासून होते. काही पाच दिवसांपासून होते. एक अज्ञात रुग्ण होती, तिच्या डोक्याला मार लागलेला होता. तिला ब्रेन ट्रॉमा होता”, अशी माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली.

“दोन रुग्ण असे होते की, त्यांची फुफ्फुस खराब झाले होते. त्यांचा संसर्ग होऊन मृत्यू झाला. तीन-चार रुग्ण असे होते की, मल्टि ऑर्गन डिसफंक्शनमुळे त्यांचा मृत्यू झाला. काही अनियंत्रित मधुमेह होता. काही ह्रदयाचा आजार होता. त्यामुळे हे रुग्ण मरण पावले”, असे प्रशासनाने म्हटले आहे.

मुख्यमंत्र्यांचे आदेश काय?

मुख्यमंत्री शिंदे यांच्या आदेशानुसार आरोग्य सेवा आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीत ठाणे जिल्हा अधिकारीही सहभागी असणार आहेत. या घटनेतील नागरीकांचा मृत्यू कसा झाला? याची कारणे ही समिती शोधणार आहे. ही समिती नेमल्यानंतर 48 तासांत मुख्यमंत्र्यांनी अहवाल द्यायचा आहे, अशी माहिती अभिजीत बांगर यांनी दिली आहे.

    follow whatsapp