कोल्हापूर : तरुणीला झाडीत नेलं, अन् 'व्हायरल'ची धमकी देऊन 7 महिने चौघांनी लचके तोडले

Kolhapur Crime News : अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत चार तरुणांनी एका 19 वर्षीय महाविद्यालयीन तरुणीवर गेल्या 7 महिन्यांपासून वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Kolhapur Crime News

Kolhapur Crime News

मुंबई तक

03 Jun 2026 (अपडेटेड: 03 Jun 2026, 11:45 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

कोल्हापूर : तरुणीला झाडीत नेलं,

point

अन् 'व्हायरल'ची धमकी देऊन 7 महिने चौघांनी लचके तोडले

Kolhapur Crime News : कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील मुरगूड परिसरातून एक अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एका 19 वर्षीय महाविद्यालयीन तरुणीला ओळखपत्र तयार करून देण्याचे आमिष दाखवून प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यात आले आणि त्यानंतर तिच्यावर तब्बल 7 महिने वारंवार अत्याचार करण्यात आले. मुख्य आरोपी आदित्य बाजीराव शेटके (वय 24) याने सुरुवातीला तरुणीचे अश्लील फोटो काढून ते व्हायरल करण्याची भीती दाखवून तिचे शोषण करण्यास सुरुवात केली. बदनामीच्या भीतीने पीडितेने सुरुवातीला कोणालाही काहीही सांगितले नाही, परंतु नराधमांनी या भीतीचा फायदा घेऊन क्रूरतेची सीमा गाठली.

हे वाचलं का?

हेही वाचा : पत्नी आणि पोलीस उपनिरीक्षकाच्या कथित अनैतिक संबंधामुळे पोलीस कर्मचाऱ्याने केले नको ते?

चौघांकडून वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन अत्याचार 

या प्रकरणात आदित्य शेटकेसोबतच त्याचे इतर तीन साथीदार रणजित संभाजी मुधोळकर (वय 29), प्रणवगिरी चंद्रशेखर पालकर (वय 24) आणि विक्रम रामचंद्र पाटील (वय 22) हे देखील सामील असल्याचे उघड झाले आहे. मुख्य आरोपी आदित्यने पीडितेची ओळख रणजित मुधोळकर याच्याशी करून दिली. त्यानंतर रणजितने तरुणीला गिरगाव, कात्यायनी आणि कोल्हापूरमधील विविध लॉजमध्ये नेऊन तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केले. एवढेच नव्हे तर, तिचे खासगी फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने तिला वारंवार ब्लॅकमेल केले. या आरोपींच्या जाळ्यातून सुटका होण्याऐवजी पीडिता अधिकच अडकत गेली आणि नराधमांचे धाडस वाढत गेले.

हेही वाचा : गंधर्व विवाहाच्या बहाण्याने उच्चशिक्षित तरुणींवर लैंगिक अत्याचार, इंजिनिअर साधूला अटक

अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत शोषण 

या साखळीत नंतर प्रणवगिरी पालकर आणि विक्रम रामचंद्र पाटील यांनीही पीडितेचे शोषण केले. पालकरने तरुणीला कारमधून नेऊन एका लॉजमध्ये अत्याचार केला, तर विक्रम पाटील याने "तुझे सर्व फोटो आणि व्हिडिओ डिलीट करून प्रकरण मिटवतो" असे खोटे आश्वासन देऊन तिला पाचगाव येथील लॉजमध्ये नेऊन अत्याचार केला. विक्रमने तर 'तू माझ्याशी लग्न केले तरच हे सर्व मिटवतो' अशी अट घालत तिचा मानसिक आणि शारीरिक छळ सुरू ठेवला. आरोपींनी पीडितेकडून प्रकरण मिटवण्यासाठी पैशांचीही मागणी केली होती, ज्यासाठी तिने काही रक्कम त्यांना दिली होती. मात्र, तरीही त्यांचा छळ थांबला नाही.

गेल्या दहा महिन्यांपासून सुरू असलेल्या या अमानुष त्रासाला कंटाळून अखेर पीडितेने मुरगूड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता आदित्य शेटके, रणजित मुधोळकर, प्रणवगिरी पालकर आणि विक्रम पाटील या चौघांनाही तात्काळ अटक केली. कोल्हापूर न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे मुरगूड आणि राधानगरी परिसरात मोठी खळबळ उडाली असून, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीरपणे उपस्थित झाला आहे.