'भगव्याचे राज्य येईल, लष्कर शौर्य दाखवेल, महागाई...', कोल्हापुरातील पट्ट्णकोडोलीच्या विठ्ठल बिरुदेव यात्रेतील भाकणूक

Kolhapur Pattan Kodoli Vitthal birudev yatra 2025 Bhaknuk : 'भगव्याचे राज्य येईल, लष्कर शौर्य दाखवेल, महागाई...', कोल्हापुरातील पट्ट्णकोडोलीच्या विठ्ठल बिरुदेव यात्रेतील भाकणूक

Mumbai Tak

मुंबई तक

13 Oct 2025 (अपडेटेड: 13 Oct 2025, 08:58 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

कोल्हापुरातील पट्ट्णकोडोलीच्या विठ्ठल बिरुदेव यात्रेतील भाकणूक

point

भारतीय लष्कर आणि राजकारणाबाबत मोठी भाकणूक

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टणकोडोली येथे श्री क्षेत्र विठ्ठल-बिरुदेव देवस्थानची पारंपरिक यात्रा भक्तीभावात पार पडली. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि गोवा या राज्यांमधून लाखो भाविकांनी उपस्थित राहून भक्तिरसात तल्लीन होऊन निघालेली ही यात्रा यंदाही धार्मिक आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणारी ठरली. यात्रेदरम्यान प.पू. श्री खेलोबा राजाभाऊ वाघमोडे (महाराज) बाबा यांनी केलेल्या वार्षिक भाकणूकीने भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेतले.

हे वाचलं का?

या वेळी सुमारे 70 टन भंडारा उधळण्यात आला. संपूर्ण गाव हलदीच्या रंगात न्हाऊन निघाले. जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि जिल्हा पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता हे प्रथमच यात्रेस उपस्थित राहून श्री विठ्ठल-बिरुदेवांचे दर्शन घेतले. चावडी येथे तलवारींची पूजा, मान्यवरांचा सत्कार, तसेच धनगर समाजाच्या पंच मंडळीने फरांडे बाबांना भेट देऊन पारंपरिक विधी पूर्ण केला.

शोभायात्रा भानस मंदिर आणि कल्लेश्वर मंदिर मार्गाने मुख्य मंदिरासमोर आली. या वेळी पारंपरिक हेडम नृत्य सादर करत फरांडे बाबांनी भविष्यवाणी केली. त्यांच्या मते, “सात दिवसांत पाऊस येईल, बळिराजाचा मृग नक्षत्रात संपूर्ण देशात पेरा होईल. मिरची व रस भांडे यांच्या किमती वाढतील, भारतीय लष्कराचे शौर्य जगभर उजळून निघेल. राजकारणात गोंधळ निर्माण होऊन शेवटी भगव्याचे राज्य येईल. देवसेवकांवरील रोगराई नाहीशी होईल,” अशी भाकणूक देण्यात आली.

विठ्ठल बिरुदेव यात्रेतील भाकणूक काय सांगते?

श्री. क्षेत्र विठ्ठल-बिरदेव देवस्थान, पट्टणकोडोली, प.पू. श्री. खेलोबा रा‌जाभाऊ वाघमोडे

पर्जन्य - सात दिवसात याऊस येडेल.

बळीराजा - रोहिनीचा पाऊस, मृगाचा पेरा संपूर्ण देशात होईल.

धारण- दोन, सव्वा दोन, अडीच आपल्या मनाप्रमाणे होईल.

महागाई - मिरची, रसभडि कडक होईल.

भूमाता - भारतीय लष्कराचे शौर्य जगात चमकेल.

आशीर्वाद नवल्या मी होईन आणि हातात काठी घेऊन स्वतः मेंढ्या राखीन.

राजकारण- राजकारणात गोंधळ होऊन उलतायालत होईल तसेच धमचेि, भगव्याचे राज्य येईल.

रोगराई - देवाची सेवा करणाऱ्याची रोगराई दूर होईल,

कांबळा - माझ्या गुरुचे चरण जो घरेल त्याला मी सदैव कांबळ्याखाली घरेन.

या वेळी भक्तांनी फरांदे बाबांवर भंडारा, खारीक, नारळांचा वर्षाव करत भक्तिभाव प्रकट केला. संपूर्ण परिसर ‘जय बिरुदेव’च्या घोषणांनी दुमदुमून गेला होता. शेकडो झेंडे आणि टाळ-मृदंगांच्या निनादात वातावरण भारावून गेले होते. पट्टणकोडोली यात्रा ही फक्त धार्मिक नव्हे, तर सांस्कृतिक आणि सामाजिक एकतेचा उत्सव म्हणूनही ओळखली जाते. पुढील चार दिवस यात्रा कार्यक्रम सुरू राहणार असून, यात्रेच्या सुयोग्य आयोजनामुळे भाविकांना दर्शनासाठी कोणतीही अडचण भासली नाही. श्रद्धा, परंपरा आणि भक्तीचा संगम घडवणारी ही यात्रा यंदाही भक्तांच्या मनावर अधिराज्य गाजवून गेली.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

कोल्हापुरातल्या आमदाराला अश्लील फोटो अन् मेसेज पाठवले, हनीट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न, बहीण भावाला अटक

    follow whatsapp