डोंबिवलीत राडा, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याने ड्रायव्हरवर चाकूने केला हल्ला, दोघेही जखमी, घटना CCTV मध्ये कैद

Dombivli Crime : डोंबिवलीच्या नांदीवली परिसरात दिवसाढवळ्या रक्तरंजीत थरार दिसून आला. शिवसेना पदाधिकारी सुदाम जाधव आणि त्याचा चालक मनोज नाटेकर यांच्यात वेतनावरून वादंग उसळले.

Dombivli Crime

Dombivli Crime

मुंबई तक

12 Oct 2025 (अपडेटेड: 12 Oct 2025, 09:01 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

डोंबिवलीच्या नांदीवली परिसरात रक्तरंजीत थरार

point

शिवसेना पदाधिकाऱ्याने चालकावर धारदार शस्त्र हल्ला केला

point

नेमकं दोघांमध्ये काय घडलं?

Dombivli Crime : डोंबिवलीच्या नांदीवली परिसरात दिवसाढवळ्या रक्तरंजीत थरार दिसून आला. शिवसेना पदाधिकारी सुदाम जाधव आणि त्याचा चालक मनोज नाटेकर यांच्यात वेतनावरून वादंग उसळले. त्यानंतर त्यांचात हाणामारी झाली. त्यांच्यातील वाद इतका टोकाला गेला की, दोघांनीही एकमेकांवर चाकूने वार केले. या घटनेत दोघेही गंभीरपणे जखमी झाले आहेत. दरम्यान, त्यांच्यावर आता रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे सांगितले जात आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : बीड हादरलं! सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या कुटुंबावर प्राणघातक हल्ला, 15 जणांनी महिलांवर धारधार कोयत्याने रक्तबंबाळ होईपर्यंत...

सुदाम जाधववर चाकूने वार 

प्राथमिक माहितीनुसार, तीन महिन्यांपासून ड्रायव्हर मनोज नाटेकर संतप्त झाले. काही महिन्यांचा पगार न दिल्याच्या कारणावरून त्यांच्यात वाद उफळला आणि रागाच्या भरात सुदाम जाधववर चाकूने हल्ला करत वार केलेत. प्रत्युत्तर देत सुदाम जाधवनेही हातातील वस्तूने हल्ला करत नाटेकरला जखमी केलं. या भररस्त्यावरील थरारक चित्राने परिसरात एकच खळबळ उडाली. हा एकूण परिसर हादरून गेला आहे. 

घटनेचा थरार सीसीटीव्हीत कैद 

या घटनेचे थरारक चित्र रस्त्यालगत लावण्यात आलेल्या एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचं बोललं जातंय. या घटनेनं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून परिसरात खळबळ उडाली आहे. 

हे ही वाचा : पुणे : बिबट्या शेतात दबा धरून होता, मुलीला पाहताच बिपट्याने घेतली झडप, नंतर आजोबांच्या डोळ्यादेखतच थरार...

दोघांचीही प्रकृती चिंतानजक

संबंधित घटनेची माहिती पोलिसांना मनपाडा पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. सध्या दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले असून दोघांचीही प्रकृतीही चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, पोलिसांनी दोघांविरोधातही गुन्हा दाखल केला आहे. सुदाम जाधवन हे डोंबिवली शिवसेनेचे पदाधिकारी मानले जात असून रिक्षा यूनियनचे लीडरही आहेत. 

    follow whatsapp