भाजप नेत्याकडून 'त्या' मागणीसाठी छळ, त्रासाला कंटाळून नृत्यांगणा दिपाली पाटीलची आत्महत्या; FIR मधून सगळं समोर

Dancer Deepali Patil commits suicide Case : पोलिसांनी रात्रीच पंचनामा करून दुसऱ्या दिवशी सकाळी शवविच्छेदन केले. डॉक्टरांनी दिपालीचा मृत्यू गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे नमूद केले. दिपालीचा मृतदेह आई आणि नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला असून अंत्यविधीसाठी कल्याण येथे होणार आहे.

Dancer Deepali Patil commits suicide Case

Dancer Deepali Patil commits suicide Case

मुंबई तक

06 Dec 2025 (अपडेटेड: 06 Dec 2025, 09:25 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

भाजप नेत्याकडून 'त्या' मागणीसाठी छळ

point

त्रासाला कंटाळून नृत्यांगणा दिपाली पाटीलची आत्महत्या

point

FIR मधून सगळं समोर

Dancer Deepali Patil commits suicide Case ,अहिल्यानगर : जामखेड येथील नृत्यांगना दिपाली गोकुळ पाटील (वय 34) हिने छळ, मानसिक त्रास आणि सततच्या दबावाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भाजपचे माजी नगरसेवक संदिप सुरेश गायकवाड या व्यक्तीने तिच्यावर ‘लग्नाची मागणी’ स्वीकारण्यासाठी मानसिक दबाव टाकला होता, असे दिपालीच्या आईने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादीच्या आधारावर जामखेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

हे वाचलं का?

दिपाली पाटील ही जामखेडमधील ‘घुंगरू कला केंद्र’ येथे सुमारे दोन वर्षांपासून नृत्यकला शिकवत होती. नोकरीदरम्यान ती तिच्या दोन मैत्रिणी हर्षदा कामटे आणि चांदणी रंजन रॉय यांच्यासोबत तपनेश्वर गल्ली, जामखेड येथे राहत होती. दिपाली तिचे पती गोकुळ यांच्यापासून ती गेल्या पाच वर्षांपासून विभक्त राहत होती.

दिपालीची आई दुर्गा गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, संदिप सुरेश गायकवाड हा दिपालीच्या मागे लागून सतत लग्नाचा आग्रह धरत होता. “मी तुझ्याशी लग्न करणार आहे, तू होकार दे” असा दबाव टाकत तो दिपालीला त्रास देत असल्याचे तिने अनेकदा आईला फोनवर सांगितले होते.

हेही वाचा : माजी नेत्याच्या सुनेसोबत धक्कादायक घटना! लग्नानंतर एका महिन्यातच आत्महत्या केल्याचा आरोप... नेमकं प्रकरण काय?

घटनेचा दिवस : लॉजवर जात दिपालीची आत्महत्या

4 डिसेंबर रोजी दुपारी सुमारे 12.50ला दिपाली संदिप गायकवाडसोबत साई लॉज, बटेवाडी येथे गेल्याचे तिची मैत्रीण चांदणीने फोनवरून कळवले. संध्याकाळपर्यंत दिपाली परत न आल्याने चांदणी आणि हर्षदा दोघी साई लॉजमध्ये गेल्या. दिपालीची रूम क्रमांक 103 आतून बंद होती. कर्मचाऱ्याकडून डुप्लिकेट चावी घेऊन दरवाजा उघडण्यात आला तेव्हा दिपालीचा मृतदेह पंख्याला ओढणीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. मैत्रिणींनी तात्काळ दिपालीला खाली उतरवून अॅम्बुलन्स बोलावली. पण जामखेड ग्रामीण रुग्णालयात पोहोचल्यावर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

पोस्टमॉर्टेममध्ये आत्महत्येची खात्री

पोलिसांनी रात्रीच पंचनामा करून दुसऱ्या दिवशी सकाळी शवविच्छेदन केले. डॉक्टरांनी दिपालीचा मृत्यू गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे नमूद केले. दिपालीचा मृतदेह आई आणि नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला असून अंत्यविधीसाठी तो कल्याण येथे नेण्यात आला.

सततच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या, आईची तक्रार

फिर्यादीत दुर्गा गायकवाड यांनी स्पष्ट म्हटले आहे की, संदिप गायकवाड याच्या सततच्या मागणी, त्रास, मानसिक छळामुळे दिपाली पूर्णपणे त्रस्त झाली होती. त्याच्या दबावाला कंटाळूनच तिने आत्महत्येचा निर्णय घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी संदिप सुरेश गायकवाड याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास जामखेड पोलीस करत आहेत.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

जामखेड : नृत्यांगणा दिपाली पाटीलची लॉजवर गळफास घेऊन आत्महत्या, भाजप नेता मुख्य आरोपी असल्याने खळबळ

 

 

 

 

 

    follow whatsapp