जामखेड : नृत्यांगणा दिपाली पाटीलची लॉजवर गळफास घेऊन आत्महत्या, भाजप नेता मुख्य आरोपी असल्याने खळबळ

मुंबई तक

Dancer Deepali Patil commits suicide Case : कर्जत जामखेडचे आमदार आमदार रोहित पवार यांनी या घटनेवर गंभीर प्रश्न उपस्थित करत संबंधित लॉजचे सीसीटीव्ही फुटेज जप्त करून सखोल चौकशीची मागणी केली आहे.

ADVERTISEMENT

Dancer Deepali Patil commits suicide Case
Dancer Deepali Patil commits suicide Case
social share
google news

बातम्या हायलाइट

point

जामखेड : नृत्यांगणा दिपाली पाटीलची लॉजवर गळफास घेऊन आत्महत्या

point

भाजप नेता मुख्य आरोपी असल्याने खळबळ

अहिल्यानगर : जामखेडमध्ये नृत्यांगणा दिपाली गोकुळ पाटील हिने खर्डा रोडवरील एका लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मैत्रिणीच्या तक्रारीवरून जामखेड पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

भाजपाचे माजी नगरसेवक संदीप गायकवाड मुख्य आरोपी 

दिपाली बाजारात जात असल्याचे सांगून घरातून निघाली होती. बराच वेळ उलटूनही ती न परतल्याने मैत्रीण शोध घेत लॉजवर पोहोचली. दरवाजा न उघडल्याने वेटरच्या मदतीने खोली उघडण्यात आली असता दिपालीने गळफास घेतल्याचे दिसून आले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या प्रकरणात भाजपाचे माजी नगरसेवक संदीप गायकवाड यांना आरोपी करण्यात आले असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. कर्जत जामखेडचे आमदार आमदार रोहित पवार यांनी या घटनेवर गंभीर प्रश्न उपस्थित करत संबंधित लॉजचे सीसीटीव्ही फुटेज जप्त करून सखोल चौकशीची मागणी केली आहे.

हेही वाचा : माजी नेत्याच्या सुनेसोबत धक्कादायक घटना! लग्नानंतर एका महिन्यातच आत्महत्या केल्याचा आरोप... नेमकं प्रकरण काय?

रोहित पवार काय काय म्हणाले? 

रोहित पवार म्हणाले, आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात संदीप गायकवाड याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. हा तोच आरोपी आहे ज्याच्या पत्नीला भाजपने नगरसेवक पदाची उमेदवारी दिली आहे. स्वतःचं लग्न झालं असतानाही एका नर्तिकेवर लग्न करण्यासाठी दबाव आणल्यामुळं तिच्यावर आत्महत्या करण्याची वेळ या आरोपीमुळे आली. या घटनेमुळे भाजपचा खरा चेहरा पुढं आला आणि असे अनेक नमुने आहेत ज्यांना भाजपने नगरपरिषद निवडणुकीत उमेदवारी दिली.. हिच आहे #party_with_difference भाजपा. आता कोणत्याही दबावाला बळी न पडता आत्महत्या केलेल्या महिलेला न्याय मिळवून द्यावा. एका महिलेला न्याय मिळावा म्हणून आमचंही या गुन्ह्याच्या तपासाकडे बारकाईने लक्ष राहील.

हे वाचलं का?

    follow whatsapp