बीड हादरलं! सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या कुटुंबावर प्राणघातक हल्ला, 15 जणांनी महिलांवर धारधार कोयत्याने रक्तबंबाळ होईपर्यंत...

मुंबई तक

Beed Crime : बीड जिल्ह्यातील शिरुर तालुक्यात एक खळबळजनक प्रकार घडला आहे. भाजप आमदार सुरेश धस यांचा निकटवर्तीय मानल्या गेलेल्या सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या कुटुंबावर मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञातांनी प्राणघातक हल्ला केल्याचा प्रकार उघडकीस आला.

ADVERTISEMENT

Beed Crime
Beed Crime
social share
google news

बातम्या हायलाइट

point

शिरुर तालुक्यात एक खळबळजनक प्रकार

point

खोक्या भोसलेच्या कुटुंबावर मध्यरात्री अज्ञातांकडून प्राणघातक हल्ला

Beed Crime : बीड जिल्ह्यातील शिरुर तालुक्यात एक खळबळजनक प्रकार घडला आहे. भाजप आमदार सुरेश धस यांचा निकटवर्तीय मानल्या गेलेल्या सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या कुटुंबावर मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञातांनी प्राणघातक हल्ला केल्याचा प्रकार उघडकीस आला. या एकूण हल्ल्यात चार महिला गंभीररीत्या जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे, त्यापैकी एका महिलेची प्रकृती ही चिंताजनक असल्याचं समजतंय. ही धक्कादायक घटना शिरुर तालुक्यातील तहसील कार्यालयाजवळील गायरान वस्तीत घडल्याचं सांगण्यात येत आहे. 

हे ही वाचा : छत्रपती संभाजीनगर! शाळेतून घरी परतताना दोन वर्गमित्र पोहायला गेले, बॅग आणि कपडे काठावर ठेवले, नंतर दोघांनी उडी घेतली अन्...

मध्यरात्री 10 ते 15 जणांच्या टोळक्याने हल्ला केला

या प्रकरणात मध्यरात्री साडेअकरा वाजता एक दोन नाही तर तब्बल 10 ते 15 जणांच्या टोळक्याने अचानकपणे हल्ला केला. टोळक्याच्या हातात लाकडी दांडके, कोयते, कुऱ्हाडीसारखी धारदार शस्त्रांचा वापर करत कुटुंबातील महिलांवर अमानुषपणे धारदार शस्त्राने हल्ला चढवला होता. 

जीव वाचवण्यासाठी आरडाओरड

या प्रकरणात महिलांनी जीव वाचवण्यासाठी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. पण टोळक्याने कसलाही विचार न करता डोक्यावर तसेच पाठीत आणि पायावर सपासप वार करण्यात आले होते. या हल्ल्यात महिला रक्तबंबाळ झाल्या होत्या. जखमी महिलांनी कशीबशी शिरुर पोलीस ठाण्याची वाट धरली आणि तक्रार दाखल केली. तेव्हा पोलिसांनी परिस्थिती पाहता तातडीने कारवाई करत जखमी महिलांना बीडच्या शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आणि त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. 

हे ही वाचा : परपुरुषासोबतचा अश्लील फोटो बॉयफ्रेंडला दिसताच लॉजवर मोठं कांड, पुण्याच्या वाकडमधील घटनेने खळबळ

इथं का राहता?

टोळक्यांनी सतीश भोसलेच्या आईला इथं का राहता? असा प्रश्न करत कुटुंबाला मारहाण केली. या घटनेनं घटनास्थळी भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. शिरुर पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असल्याचं सांगण्यात येत आहे. संबंधित प्रकरणात आरोपीची शोधमोहिम करण्याचे काम सुरु आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp