Maharashtra Weather : राज्यात आज 6 नोव्हेंबर रोजी हवामानाचा अंदाज असा आहे की, बहुतेक भागांत धुके आणि धूर राहण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभाग (IMD) आणि अन्य स्रोतांनुसार, राज्यात कोरडे हवामान कायम राहणार असल्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. अशातच राज्यातील 6 नोव्हेंबर रोजी नेमकं कसं वातावरण असेल याची माहिती पुढीलप्रमाणे नमूद करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : नांदेड हादरलं! लग्नाला वर्षच झालं, बायको गर्भवती असताना तरुणाचा विजेच्या झटक्यानं दुर्दैवी अंत, भावाचंही निधन
कोकण विभाग :
कोकण विभागात रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांचा समावेश होतो. या एकूण जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. यापैकी मुंबईमध्ये धुके राहण्याची शक्यता आहे, तसेच तापमानात घट जाणवेल.
मध्य महाराष्ट्र विभाग :
मध्य महाराष्ट्र विभागात धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांचा समावेश होतो. या सर्वच जिल्ह्यांमध्ये वातावरण कोरडं राहण्याची शक्यता आहे. या विभागातील पुणे शहरात धुक्यासह थंडी वाढण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी तापमानात घट होण्याची शक्यता आहे.
मराठवाडा विभाग :
मराठवाडा विभागात सर्वच जिल्ह्यांमध्ये कोरडं वातावरण राहणार असल्याची शक्यता आहे. याच विभागात सर्वच जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडं राहणार असल्याची शक्यता आहे, असे भारतीय हवामान खात्याने (IMD) म्हटले आहे.
हे ही वाचा : "पंतप्रधान मोदी आणि मी..." राष्ट्राध्यक्ष पुतिन नेमकं काय म्हणाले? SCO शिखर परिषदेदरम्यान एकत्र कारमध्ये बसण्यामागील Inside Story
विदर्भ विभाग :
विदर्भ विभागात डिसेंबरच्या सुरुवातीलाच राज्यात थंडीची लाट जाणवत आहे. तसेच हवामानाक कोरडं रहाण्याची देखील दाट शक्यता आहे. तापमानात फारसा बदल होणार नसून तापमान स्थिर राहणार असल्याचं बोललं जातंय.
ADVERTISEMENT











