नांदेड हादरलं! लग्नाला वर्षच झालं, बायको गर्भवती असताना तरुणाचा विजेच्या झटक्यानं दुर्दैवी अंत, भावाचंही निधन
nanded news : नांदेड जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणाला 6 केव्ही प्रवाहाचा विजेचा तीव्र झटका लागल्याने त्याचा मृत्यू झाला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
नांदेड जिल्ह्यात धक्कादायक घटना
बायकोच्या पोटात बाळ अन् विजेचा झटका लागून पतीचा मृत्यू
nanded news : कुवरचंद मंडले - नांदेड जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणाला 6 केव्ही प्रवाहाचा विजेचा तीव्र झटका लागल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना वसरणी परिसरात घडली होती, या घटनेनं घटनास्थळी हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत्यू झालेल्या तरुणाची पत्नी ही गरोदर असल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना 4 डिसेंबर रोजी घडली आहे.
हे ही वाचा : छत्रपती संभाजीनगरात बैलगाडीसमोर आलेल्या बिबट्याला बैलांनीच उधळवून लावले, उसतोड मजूर...
बायकोच्या पोटात बाळ अन् विजेचा झटका लागून पतीचा मृत्यू
मिळालेल्या एकूण माहितीनुसार, मृत तरुणाचे नाव रोहित मीठुलाल मंडले (वय 23) असे आहे. वसरणी परिसरात गुरुवारी ही धक्कादायक घटना घडली होती. विद्युत प्रवाहाचा झटका लागल्याने त्याचा जागीच मृ्त्यू झाला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे त्याचं मागील वर्षी विवाह झाला होता, त्याची पत्नी ही गरोदर आहे. आपल्या जन्माला येणाऱ्या बाळाचं तोंड पाहण्याआधीच त्याचा अंत झाला. या घटनेनं कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
काही वर्षापूर्वी मोठ्या भावाचा मृत्यू
अशातच रोहितच्या मोठ्या भावाचा देखील काही वर्षांपूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. घरात कमावणारं एकही माणूस उरलेलं नाही. वृद्ध आई-वडील आणि गरोदर पत्नी अशी परिस्थिती आहे. यामुळे घरात कमावणारे कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे. रोहितच्या पत्नीला महावितरणामध्ये नोकरी द्यावी आणि या प्रकरणात दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी गरोदर महिलेच्या माहेरच्या कुटुंबियांनी केली आहे.
हे ही वाचा : 'सायको किलर पूनम एकादशीला मुलांना मारायची', भावानेच पोलिसांकडे मृत्यूदंडाची केली मागणी
कुटुंबाच्या आयुष्याची विस्कटलेली घडी पुन्हा बसवण्यासाठी शासनाने पुढाकारण घेणं गरजेचं असल्याचं स्थानिकांनी सांगितलं आहे. दरम्यान, या घटनेनं गावात शोक व्यक्त केला जात आहे.










