छत्रपती संभाजीनगरात बैलगाडीसमोर आलेल्या बिबट्याला बैलांनीच उधळवून लावले, उसतोड मजूर...

मुंबई तक

Maharashtra leopard news : छत्रपती संभाजीनगरातील खुलताबाद येथील जानफेळ परिसरात बिबट्या रस्त्यावर फिरत होता. तेव्हा ऊसतोडीसाठी आलेल्या बैलगाड्यांच्या समोरच उसाच्या शेतात बिबट्या अचानकपणे बाहेर आल्यानंतर बैलांनी बिबट्याला पळवले.

ADVERTISEMENT

Maharashtra leopard news
Maharashtra leopard news
social share
google news

बातम्या हायलाइट

point

छत्रपती संभाजीनगरातील खुलताबादेत बैलगाडीसमोर बिबट्या

point

बिबट्याला पाहून बैल उधळले

Maharashtra leopard news : राज्यभरातील काही भागांमध्ये बिबट्याने थैमान घातलं आहे. काही मानव वस्तीत बिबट्या फिरत असल्याच्या घटना घडू लागलेल्या आहेत. त्याचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसताहेत. अशीच एक घटना छत्रपती संभाजीनगरातील खुलताबाद येथील जानफेळ परिसरात बिबट्या रस्त्यावर फिरत होता. तेव्हा ऊसतोडीसाठी आलेल्या बैलगाड्यांच्या समोरच उसाच्या शेतात बिबट्या अचानकपणे बाहेर आल्यानंतर बैल उधळले. ही घटना 1 डिसेंबर रोजी सकाळी घडली. 

हे ही वाचा : 'सायको किलर पूनम एकादशीला मुलांना मारायची', भावानेच पोलिसांकडे मृत्यूदंडाची केली मागणी

ऊसतोड कामगार भयभीत

या घटनेदरम्यान, ऊसतोड कामगार भयभीत झाले. जीव वाचवण्यासाठी त्यांनी जीवाच्या आकांताने आरडाओरड केली. तेव्हा उधळलले बैल आणि तिथल्या गोंगाटामुळे चक्क बिबट्या भयभीत झाला आणि त्यान जिवाच्या आकांताने शेतातून पळ काढला. सोमवारी सकाळी ते ममुराबादवाडी उसतोडीसाठी निघाले होते. त्यातील काही चार बैलगाड्या या काही अंतरावर पुढे निघून गेल्या होत्या. अचानकपणे मागील चार बैलगाडीच्या समोर बिबट्या आला आणि उभा ठाकला होता. 

बैलांनी धूम ठोकली अन् बिपट्याही गेला पळून 

त्याला बघून बैलही बिथरू लागले होते, परिस्थिती बघून बैलांनी धूम ठोकली. तेव्हा बैलगाड्यांमध्ये बसलेले मजूर हैराण झाल्याचे सांगण्यात आले. घटनास्थळी एकच गोंधळ उडाला होता. त्याचक्षणी बिबट्याने घटनास्थळावरून शेतात धाव घेतली. काही अंतरावर गेलेल्या मजुरांनी बैलांना आवर घातला. नंतर मजूरांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. या घटनेनं घटनास्थळी भीतीचे वातावरण आहे. 

हे ही वाचा : नवरा बायकोला म्हणाला, 'मला थोरल्या मुलीसोबत झोपायचंय...' तिनं संतापून... नात्याला काळीमा फासणारा प्रकार

दरम्यान, सध्या राज्यभरात मोठ्या प्रमाणात बिबट्यांचा वावर वाढला आहे. काही दिवसांपूर्वी शेतकरी बिबट्याच्या भीतीने आपल्या गळ्याला काटेरी पट्टा लावत आपलं शेतकाम करत होते. बिबट्याच्या या सततच्या वावराने जंगलाच्या आसपासच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp