"पंतप्रधान मोदी आणि मी..." राष्ट्राध्यक्ष पुतिन नेमकं काय म्हणाले? SCO शिखर परिषदेदरम्यान एकत्र कारमध्ये बसण्यामागील Inside Story
मुलाखतीत पुतिन यांनी भारत-रशिया मैत्री, पंतप्रधान मोदींचे नेतृत्व, जागतिक बदल, पाश्चात्य दबाव, ट्रम्पची धोरणे आणि युक्रेन संघर्ष यासारख्या प्रमुख मुद्द्यांवर स्पष्टपणे भाष्य केलं.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
"पंतप्रधान मोदी आणि मी..." राष्ट्राध्यक्ष पुतिन नेमकं काय म्हणाले?
SCO शिखर परिषदेदरम्यान एकत्र कारमध्ये बसण्यामागील Inside Story
India Russia Trade Deal: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आता भारत दौऱ्यावर आहेत. त्यांच्या भारत भेटीपूर्वी त्यांनी मॉस्कोमधील क्रेमलिन येथे मीडिया चॅनेल 'आज तक'ला एक सुपर-एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली. मुलाखतीत पुतिन यांनी भारत-रशिया मैत्री, पंतप्रधान मोदींचे नेतृत्व, जागतिक बदल, पाश्चात्य दबाव, ट्रम्पची धोरणे आणि युक्रेन संघर्ष यासारख्या प्रमुख मुद्द्यांवर स्पष्टपणे भाष्य केलं.
पंतप्रधान मोदी आपले मित्र असल्याचं सांगून पुतिन म्हणाले की, "भारत आज जगातील सर्वात स्थिर आणि विश्वासार्ह भागीदार आहे. स्वातंत्र्यानंतर भारताने मिळवलेली प्रगती खरंच चमत्कारिक आहे. भारताचे सरासरी आयुर्मान दुप्पट झाले असून यातून भारताची प्रगती दिसून येते."
एससीओच्या कार डिप्लोमसीबाबत खुलासा
एससीओ बैठकीदरम्यान मोदी-पुतिन यांच्या कारमधील प्रवासाबद्दल विचारलं असता पुतिन म्हणाले की SCO बैठकीदरम्यान ते आणि पंतप्रधान मोदी कोणत्याही पूर्व नियोजनाशिवाय एकाच कारमध्ये बसले होते. त्यांनी सांगितलं की "आम्ही दोघेही बाहेर पडलो. मला माझी गाडी समोर दिसली, म्हणून मी त्यांना माझ्यासोबत यायला सांगितलं. मित्रांमध्ये असंच घडतं, त्यात वेगळं असं काहीच नव्हतं. त्यांनी कारमध्ये देशातील चालू घडमोडींवर चर्चा केली. ते म्हणाले - "दोन मित्रांमधील बोलण्याप्रमाणेच आमच्यात संवाद झाला."
हाय-टेक भागीदारीवर भाष्य
पुतिन यांनी मुलाखतीत सांगितलं की, "भारत आणि रशिया आता संरक्षणाच्या पलीकडे, हाय-टेक, अंतराळ (स्पेस), अणुऊर्जा, एआय (AI), शिपबिल्डिंग आणि विमान निर्मितीसह नवीन उंची गाठण्यासाठी सज्ज आहेत." पुतिन यांच्या भेटीदरम्यान बऱ्याच मुख्य करारांची घोषणा केली जाईल.










