Govt Job: भारतीय सैन्यात नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्नाशील असणाऱ्या तरुणांसाठी चांगली संधी उपलब्ध झाली आहे. भारतीय सैन्य (Indian Army) च्या डायरेक्टरेट जनरल ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड मॅकेनिकल इंजीनिअर्स (DG EME)कडून ग्रुप C अंतर्गत विविध सिव्हिलिअन पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 69 पदांवर भरती केली जाणार आहे. या रिक्त जागांमध्ये मल्टी टास्किंग स्टाफ (MTS), लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC), वॉशरमन, स्टेनोग्राफर ग्रेड-2 आणि ज्यूनिअर टेक्निकल ट्रेनिंग इंस्ट्रक्टर पदांचा समावेश आहे.
ADVERTISEMENT
किती पदांसाठी भरती?
1. मल्टी टास्किंग स्टाफ (MTS): 37 पदे
2. लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC): 25 पदे
3. वॉशरमन: 14 पदे
4. स्टेनोग्राफर ग्रेड-2: 2 पदे
5. ज्यूनिअर टेक्निकल ट्रेनिंग इंस्ट्रक्टर: 2 पदे
शेक्षणिक पात्रता
मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) आणि वॉशरमन पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी 10 उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. तसेच, लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC) पदासाठी 12 वी उत्तीर्ण असण्यासोबत टायपिंग, अशी पात्रता निश्चित करण्यात आली आहे. याशिवाय, स्टेनोग्राफर ग्रेड-2 पदासाठी 12 वी उत्तीर्ण+ शॉर्टहँड नॉलेज आणि ज्यूनिअर टेक्निकल ट्रेनिंग इंस्ट्रक्टर पदासाठी संबंधित क्षेत्रात डिग्री/डिप्लोमा अशी शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली आहे.
वयोमर्यादा
- मल्टी टास्किंग स्टाफ (MTS), लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC): 18 ते 25 वर्षे
- स्टेनोग्राफर ग्रेड-2, ज्यूनिअर टेक्निकल ट्रेनिंग इंस्ट्रक्टर: 21 ते 30 वर्षे
कधीपर्यंत कराल अर्ज?
या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी 11 ऑक्टोबर 2025 रोजी अर्जाची प्रक्रिया सुरू झाली असून यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार 15 नोव्हेंबर 2025 पर्यंत अर्ज करू शकतात. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारचं शुल्क आकारण्यात येणार नाही.
हे ही वाचा: MBBS चं शिक्षण घेणाऱ्या तरुणीवर सामूहिक बलात्कार! निर्जन जंगलात फरफटत नेलं अन्...
कशी होईल निवड?
या भरतीमध्ये उमेदवारांच्या नियुक्तीसाठी लेखी परीक्षा आयोजित केली जाईल. तसेच, आवश्यकता असल्यास कौशल्य चाचणी सुद्धा घेण्यात येईल. त्यानंतर, उमेदवारांची फिजिकल टेस्ट आणि डॉक्यूमेंट व्हेरिफिकेशन केलं जाईल. शेवटी, उमेदवारांची वैद्यकीय तपासणी करून अंतिम निवड केली जाईल.
हे ही वाचा: नाशिक: धावत्या ट्रेनमध्ये तब्बल 56 लाख रुपयांचे दागिने लंपास... RPF अधिकाऱ्यांनी आरोपीला ठोकल्या बेड्या!
कसा कराल अर्ज?
1. या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम https://www.indianarmy.nic.in या इंडियन आर्मीच्या अधिकृत वेबसाइटवर जा.
2. त्यानंतर, 'Group C Recruitment 2025' लिंकवर क्लिक करा.
3. आता आवश्यक माहिती भरून मागितलेले डॉक्यूमेंट्स अपलोड करा.
4. शेवटी, फॉर्म सबमिट करून भविष्यासाठी त्याची प्रिंटआउट काढून सुरक्षितरित्या ठेवा.
ADVERTISEMENT
