Maharashtra Weather : राज्यात हवामान विभागाने 11 ऑक्टोबर रोजी पावसाची सामान्य स्थिती असेल. तसेच राज्यातील भारतीय विभागातील (IMD) अंदाजानुसार कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील हावामान कोरडे असण्याची शक्यता आहे. राज्यातील एकूण हवामानाबाबत महत्त्वाची अपडेट जाणून घेऊयात.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : 45 वर्षीय शिक्षकाची 19 वर्षीय विद्यार्थिनीवर वाईट नजर, जेवणाच्या बहाण्याने घरी बोलावले, नंतर सोफ्यावर बसवून...
कोकण :
कोकण विभागातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश आहे. यापैकी 11 ऑक्टोबर रोजी पालघर, ठाणे, मुंबई, रायगड या जिल्ह्यात हवामान विभागाने कोरड्या वातावरणाचा अंदाज वर्तवला आहे. तसेच सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. एकूण कोकण भागात पावसाचा कसलाही धोका नसून वातावरण सामान्य आहे.
मध्य महाराष्ट्र :
मध्य महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश होतो. यापैकी धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे जिल्ह्यात हवामान विभागाने कोरड्या हवामानाचा अंदाज वर्तवला आहे. कोल्हापूर, साताऱ्यात हलक्या पावसाचा अंदाज आहे. तर सांगलीत वाऱ्यासह हलका पाऊस असेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
मराठवाडा :
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांचा समावेश होतो. यापैकी सर्वच जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडं राहिल असा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे.
हे ही वाचा : बीड हादरलं! ग्रामस्थांनी 'त्या' कारणावरून महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत केली मारहाण, हादरवून टाकणारं प्रकरण समोर
विदर्भ :
राज्यातील विदर्भात अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यांचा समावेश होतो. या एकूण जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने कसलीही अंदाज वर्तवलेला नाही.
ADVERTISEMENT
