Beed Crime : बीड जिल्हा गेल्या काही वर्षांपासून वादाच्या भोवऱ्यात राहिला आहे. बीडमधील राजकीय आणि सामाजिक परिस्थिती बिघडल्याचं नव्याने सांगायला नको. याच बीड जिल्ह्यातील कारी गावातील एका महिलेवर घरकुल बांधण्यावरून प्राणघातक हल्ला करण्यात आला, उषा वावळकर असे पीडित महिलेचं नाव आहे. या हल्ल्यात त्या गंभीररीत्या जखमी झाल्या आहेत. याप्रकरणी दिंद्रुड पोलीस ठाण्यात ग्रामपंचायत सदस्यांसह इतर सहा जणांविरोधात ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : अनोळखी मुलासोबत झाली ओळख आणि तरुणी 2 आठवड्यानंतर राहिली गरोदर, अन् पुढे...
'आमच्या शेजारी घर बांधू नका'
मिळालेल्या एकूण माहितीनुसार, कारी येथील रहिवासी असलेल्या उषा वावळकर यांच्या आईच्या नावे शासकीय घरकुल योजना मंजूर झाली होती. मंजूर करण्यात आलेल्या जागेवर जुने घर पाडून नवीन घराचे बांधकाम सुरु असताना, गावातील काही व्यक्तींनी विरोध करत 'आमच्या शेजारी घर बांधू नका', असं म्हणत महिलेवर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात महिला पूर्णपणे रक्तबंबाळ झाली. तेव्हा स्थानिकांमुळे महिलेचा जीव वाचला.
हल्लोखोरांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा
या भयंकर कृत्यानंतर संबंधितावर दिंद्रुड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. उषा वावळकर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी कारी ग्रामपंचायतचे सदस्य दादाराव दामोदर मोरे, दामोदर मोरे, कोंडीबा भाऊराव मोरे, शिवाजी भाऊराव मोरे, कृष्णा दामोदर मोरे आणि कैलास कोंडीबा मोरे यांच्या विरोधात भारतीय दंड विधान संहितेच्या विविध कलमांसह ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे.
हे ही वाचा : ऑक्टोबर महिन्यातील 'या' तारखेला काही राशीतील लोकांचे नशीब बदलणार, काय सांगतं राशीभविष्य?
या घटनेमुळे बीडमध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीत वाढ निर्माण झाली आहे. या वाढत्या गुन्हेगारीनं प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. दरम्यान, उषा वावळकर यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले. आता त्यांची प्रकृती ही स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिकचा तपस करत आहेत.
ADVERTISEMENT
