Viral News : प्रेम कधी कोणत्याही व्यक्तीला होऊ शकते. जात, धर्म, समुदाय, संपत्ती किंवा रंग अशा कोणत्याही व्यक्तीसोबत प्रेम होते. याचे एक जिवंत उदाहरण म्हणजे एका जर्मन महिलेला 4 हजार 800 किमी अंतरावर राहणाऱ्या एका पुरुषाशी प्रेम झाले. तो तरुण नाइजीरियाचा असल्याचं बोललं जातंय. दोघेही काही दिवसांसाठी भेटले आणि फक्त दोन आठवड्यानंतर, महिलेला कळले की ती गर्भवती आहे. दोघेहे एकमेकांसोबतच आहेत, हे पाहून अनेक नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर मुलीला ट्रोल करू लागले होते.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : गणिताच्या शिक्षकावर राग, विद्यार्थ्याने मानेत चाकूच खुपसला.. वर्षभरापूर्वी नेमकं काय घडलेलं?
डिजिटल युगात प्रेमाला सीमा नाही
आजच्या डिजिटल युगात प्रेमाला कसलीही सीमा उरलेली नाही. सोशल मीडियावर नातेसंबंध बनवणं ही एक अतिसामान्य बाब झाली आहे. पण अनेकदा समाजाकडून या नातेसंबंधाला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जर्मनी आणि नाइजीरियाच्या जोडप्याने आपल्या नात्यावर करण्यात येणाऱ्या प्रश्नांची चांगलीच उत्तरे दिली आहेत, ही गोष्ट आहे सारा आणि साइप्रियान यांची. दोन्ही देशांची विविध संस्कृती आणि भाषा असून ते दोघे एकत्र होते. सोशल मिडियावर काही लोक त्यांच्या नातेसंबंधाला संशयाच्या दृष्टीकोनातून भविष्यवाणी करते की, सारा लवकरच एका बाळाची आहे.
'लव्ह डोन्ट जज' कार्यक्रमातील अनुभव शेअर केला
त्यांनी नुकतेच आलीकडे 'लव्ह डोन्ट जज' या कार्यक्रमात त्यांचे अनुभव शेअर केले. ज्याठिकाणी त्यांनी त्यांची पहिली भेट कशी झाली याबाबत सांगितले. सायप्रियनने साराला पहिल्यांदा सोशल मीडियावर पाहिले. तिला घोड्यांची खूप आवड होती. तेव्हा त्याने कसलाही पुढचा मागचा विचार न करता तरुणीला मेसेज केला. दोघांमधील नातेसंबंधाचे रुपांतर प्रेमसंबंधात झाले.
हे ही वाचा : Viral Video : 'त्या' गाण्यावर महिलांचे ठुमके, नेटकऱ्यांना हसूच आवरेना, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल
तेव्हा साराने एक मोठा निर्णय घेतला होता आणि त्यानंतर ती सायप्रियानच्या अगदी जवळ आली. साराने अचानकपणे मोठा निर्णय घेतला. तिने सायप्रियनला समोरासमोर भेटण्यासाठी बेनिन प्रजासत्ताकाचे तिकीट बुक केले. साराने स्पष्ट केले की ती कुठे जात आहे हे तिने कोणालाही सांगितले नाही कारण तिला माहित होते की लोक तिला थांबवतील आणि म्हणतील की , हे सर्व धोकादायक आहे.
ADVERTISEMENT
