Heart Attack ने कामगार तडपत राहिला, सगळं पाहूनही दुकानाचा मालक मोबाईलमध्ये मग्न, शेवटी व्हायचं तेच झालं

Heart Attack ने कामगार तडपत राहिला, सगळं पाहूनही दुकानाचा मालक मोबाईलमध्ये मग्न, शेवटी व्हायचं तेच झालं

Mumbai Tak

मुंबई तक

11 Oct 2025 (अपडेटेड: 11 Oct 2025, 08:32 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

Heart Attack ने कामगार तडपत राहिला

point

सगळं पाहूनही दुकानाचा मालक मोबाईलमध्ये मग्न, शेवटी कामगाराचा मृत्यू

Heart Attack News : मध्य प्रदेशातील आगर मालवा जिल्ह्यात एका दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला काम करत असताना अचानक हृदयविकाराचा झटका आला. तो दुकानातील खुर्चीवर बसून तडपत होता, पण वेळेवर उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला. जर त्याला योग्यवेळी रुग्णालयात नेले असते, तर कदाचित त्याचा जीव वाचला असता. या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यात दिसते की हार्ट अटॅक आल्यावर कर्मचारी तडफडत आहे, पण दुकान मालक आपल्या खुर्चीतून उठतही नाही आणि मोबाईल वापरत शांतपणे बसलेला दिसतो.

हे वाचलं का?

किराणा दुकानाचा मालक जागेवरुन उठतही नाही 

ही धक्कादायक घटना आगर मालवा जिल्ह्यातील सुसनेर परिसरातील आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओत केवळ एका कर्मचाऱ्याच्या जीवाशी खेळ होताना दिसत नाही, तर कामाच्या ठिकाणी होत असलेल्या बेजबाबदारपणामुळे काय होऊ शकतं? हे देखील पाहायला मिळतंय. सहा मिनिटांच्या या व्हिडिओत कर्मचारी रोजच्या प्रमाणे कामात गुंतलेला असतो, पण अचानक तो आपल्या खुर्चीवर बसतो आणि काही वेळातच त्याला अस्वस्थत वाटू लागते.

हेही वाचा : Ïmpact feature: केस पुनरुज्जीवन उद्योगात तंत्रज्ञान, पारदर्शकता आणि विश्वासाचा नवा काळ

इतर कामगार मदतीसाठी धावतात, पण दुकान मालक मोबाईलमध्ये मग्न

काही क्षणातच तो शारिरीक तणावत आणि अस्वस्थत दिसू लागतो. तो हातपाय हलवू लागतो, तडफडतो, आणि त्याच्या हालचालींवरून स्पष्ट दिसते की त्याला तात्काळ वैद्यकीय मदतीची गरज आहे. हे पाहून इतर कर्मचारी त्याच्याकडे धाव घेतात, त्याला पाणी देतात, त्याला सावरण्याचा प्रयत्न करतात.

ह्रदयविकाराच्या झटक्याने कामगाराचा मृत्यू 

दरम्यान, अगदी जवळच खुर्चीवर बसलेला दुकानमालक हे सर्व पाहत राहतो. तो खुर्चीवरूनही उठत नाही. प्राथमिक मदत देखील करत नाही. शिवाय अॅम्ब्युलन्सलाही फोन करत नाही. तो मात्र आपला मोबाईल वापरत राहतो. अखेर सुमारे सहा मिनिटांच्या आत त्या तडफडणाऱ्या कर्मचाऱ्याचा श्वास थांबतो आणि त्याचा मृत्यू होतो.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

मुंबईची खबर: सी लिंक, BKC ला विमानतळाशी जोडणारा नवीन सबवे, 3 फेज अन् रस्ता तर... नव्या प्रोजेक्टविषयी जाणून घ्या

    follow whatsapp