नाशिक: धावत्या ट्रेनमध्ये तब्बल 56 लाख रुपयांचे दागिने लंपास... RPF अधिकाऱ्यांनी आरोपीला ठोकल्या बेड्या!
नाशिक जिल्ह्यात ट्रेनमध्ये एका प्रवाशाच्या बॅगेतून लाखो रुपये दागिने लंपास करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नाशिकच्या रेल्वे सुरक्षा दल (RPF) कडून या चोरीच्या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

धावत्या ट्रेनमध्ये तब्बल 56 लाख रुपयांचे दागिने लंपास...

RPF अधिकाऱ्यांनी 'असा' घेतला आरोपीचा शोध
Nashik Crime: नाशिक जिल्ह्यात ट्रेनमध्ये एका प्रवाशाच्या बॅगेतून लाखो रुपये दागिने लंपास करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नाशिकच्या रेल्वे सुरक्षा दल (RPF) कडून या चोरीच्या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, राधे गज्जू बिसोने अशी आरोपीची ओळख समोर आली असून त्याने चोरी केलेले सोने आणि चांदीच्या दागिने जप्त करण्यात आले आहेत. चोरी झालेल्या दागिन्यांची किंमत जवळपास 56.68 रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे.
मुंबई-हावडा एक्सप्रेस ट्रेनमध्ये झाली चोरी
रिपोर्टनुसार, संबंधित घटना शुक्रवारी (10 ऑक्टोबर) रोजी मुंबई-हावडा एक्सप्रेस ट्रेनमध्ये घडली. या ट्रेनमधून प्रदीप कुमार धर्मपाल सिंग नावाचा प्रवासी प्रवास करत होता. पीडित प्रवाशाकडे दागिन्यांनी भरलेली बॅग होती. ट्रेन नाशिकला पोहोचल्यानंतर, आरोपीने संधी साधून पीडित तरुणाची दागिन्यांनी भरलेली बॅग चोरली आणि तिथून फरार होण्याचा प्रयत्न केला. संबंधित तरुणाला आपली दागिन्यांची बॅग चोरी झाल्याचं लक्षात येताच, त्याने तातडीने स्थानिक RPF जवानांना याची माहिती दिली.
हे ही वाचा: लहान मुलाच्या गळ्याला चाकू लावून घर लुटलं, जबरी दरोड्याने अवघं सोलापूर हादरलं
RPF टीमने घेतला आरोपीचा शोध
तक्रार मिळताच, RPF टीमने लगेच आरोपीचा शोध घेण्यास सुरूवात केली. तपासादरम्यान, प्रवासी आणि संशयास्पद व्यक्तींची चौकशी करण्यात आली तसेच, ट्रेनच्या आतसुद्धा शोध घेण्यात आला. दरम्यान, तपास पथकाला राधे गज्जू बिसोने नावाच्या तरुणावर संशय आहे. अगदी संशयास्पद पद्धतीने आरोपी आपली बॅग सांभाळताना दिसला. उपस्थित अधिकाऱ्यांनी आरोपीच्या सामानाची झडती घेतली असता, त्यात पीडित प्रदीप कुमार यांची चोरी झालेली दागिन्यांची बॅग आढळली.
हे ही वाचा: Personal Finance: 40व्या वर्षी तुमच्याकडे येतील 5 कोटी रुपये! SIP तुम्हाला बनवेल करोडपती
तब्बल 56.68 लाख रुपयांचे दागिने...
RPF ने दिलेल्या माहितीनुसार, आरोपीकडून जप्त करण्यात आलेल्या बॅगमध्ये 50 तोळ्यांपेक्षा अधिक सोने आणि चांदीचे दागिने सापडले. या दागिन्यांची किंमत जवळपास 56.68 लाख रुपये असल्याची माहिती आहे. हे दागिने पीडित प्रवाशाकडे सोपवण्यात आले असून आरोपीला पोलीस कस्टडीमध्ये ठेवण्यात आलं. प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. रेल्वे सुरक्षा दलाने प्रवाशांना त्यांच्या मौल्यवान वस्तूंची विशेष काळजी घेण्याचं आणि कोणत्याही संशयास्पद हालचालीची माहिती रेल्वे पोलीस किंवा आरपीएफ (RPF)ला त्वरित देण्याचं आवाहन केलं आहे.