लहान मुलाच्या गळ्याला चाकू लावून घर लुटलं, जबरी दरोड्याने अवघं सोलापूर हादरलं
सोलापूरमध्ये काही दरोडेखोरांनी शहरातील दोन घरांमध्ये जबरी दरोडा घातला. चोरी करून हे चोरटे पसार झाल्याने आता त्यांना शोधण्याचं मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.
ADVERTISEMENT

सोलापूर: सोलापूर शहरातील एका सोसायटीत चोरट्यांनी धुमाकूळ घातला. गळ्यावर चाकू लावून दोन घरांत धाडसी चोरी केली आहे. अवंती नगर येथील अभिषेक नगरमध्ये हा सशस्त्र दरोडा पडला. शनिवारी पहाटेच्या सुमारास साधारणपणे अडीचच्या वेळेस सशस्त्र चोरट्यांनी केलेली जबरी चोरी केली. चोरट्यांनी केलेल्या धाडसी चोरीमुळे सोलापूर शहरात खळबळ उडाली आहे. शस्त्रधारी टोळीने घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला आणि घरातील नागरिकांना वेठीस धरून लुटल्याची धक्कादायक माहिती पीडितांनी दिली आहे.
प्राथमिक माहितीनुसार दरोडेखोरांनी लहान मुलाच्या गळ्यावर चाकू लावून चोरी केल्याची घटना घडली आहे. सोनं आणि रोख रक्कम असा ऐवज लंपास केला आहे. अवंती नगर येथील दोन घरांत चोरट्यांनी असा धक्कादायक प्रकार केल्याने पोलीस प्रशासन कसून तपास करत आहे. गुन्हे शाखेच्या सहाय्यक पोलीस आयुक्त अश्विनी पाटील हे फौजफाटा आणि डॉग स्क्वाड घेऊन चोरट्यांचा तपास करत आहेत.
चोरट्यांनी धाडसी चोरी करत दोन घरात घातला धुमाकूळ
अवंती नगर येथील पीडित कुटुंबातील नागरिकांनी घाबरलेल्या अवस्थेत पोलिसांना माहिती दिली. पूजा अन्नदाते आणि स्नेहा राजपूत यांनी माहिती देताना सांगितले की, ''शनिवारी पहाटे अडीच ते 3 वाजण्याच्या सुमारास आम्ही गाढ झोपेत होतो. रात्री अचानक काही लोक घरात घुसले आणि गळ्याला चाकू लावून धमकावलं. पतीला मारहाण करत घरातील सोनं व रोख रक्कम लुटली. त्यानंतर ते चोरटे खालच्या घरात गेले आणि तिथेही तसंच केलं." अज्ञात चोरट्यांनी अवंती नगर येथील अभिषेक नगरमधील दोन घरांत जवळपास अर्धा तास धुमाकूळ घातला.
हे ही वाचा>> गावी सोडतो असं सांगत तिघांनी 50 वर्षीय विधवा महिलेला नेलं निर्जनस्थळी, आळीपाळीने नको तेच... नंतर पोटात होऊ लागल्या वेदना
नाईट राऊंडवरील पोलीस तात्काळ घटनास्थळी...
दरोडेखोरांनी अवंती नगर येथील दोन घरात सशस्त्र दरोडा घातल्यानंतर पीडित कुटुंबीयानी ताबडतोब कन्ट्रोलला कॉल करून माहिती दिली. नाईट राऊंडला असलेल्या पोलिसांची वेळेवर हजेरी लागल्यामुळे इतर घरे लुटण्याचा दरोडेखोरांचा प्रयत्न फसला. अंधाराचा फायदा घेऊन दरोडेखोर पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. सोलापूर पोलिसांची टीम वेगवेगळे पथके तयार करुन तपास करत आहेत.