चहा पिताच महिलेला झाला भलताच आजार, चिकटपट्टी लावून करावा लागतो डोळा बंद! कारण...

आपल्या मुलीला जन्म दिल्याच्या काही आठवड्यानंतर केवळ एक कप चहा प्यायल्याने पीडितेचा चेहरा सुन्न पडला आणि तिचे ओठ, डोळे, पापण्या आणि चेहऱ्याच्या स्नायूंनी काम करणं बंद केलं. नेमकं काय घडलं?

एक कप चहा प्यायल्याने झाला भयानक आजार!

एक कप चहा प्यायल्याने झाला भयानक आजार!

मुंबई तक

13 Oct 2025 (अपडेटेड: 13 Oct 2025, 10:08 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

एक कप चहा प्यायल्याने झाला भयानक आजार!

point

आता डोळे बंद करण्यासाठी टेप लावते अन्...

point

नेमकं काय घडलं?

Viral Story: स्कॉटलँडमध्ये राहणाऱ्या एका महिलेने स्वत:वर ओढवलेल्या एका भयानक क्षणाबद्दल सांगितलं. आपल्या मुलीला जन्म दिल्याच्या काही आठवड्यानंतर केवळ एक कप चहा प्यायल्याने पीडितेचा चेहरा सुन्न पडला आणि तिचे ओठ, डोळे, पापण्या आणि चेहऱ्याच्या स्नायूंनी काम करणं बंद केलं. नेमकं काय घडलं? 

हे वाचलं का?

रिपोर्ट्सनुसार, 30 वर्षीय करीना व्हाइट नावाच्या महिलेने 8 ऑगस्ट रोजी तिच्या मुलीला जन्म दिला. गर्भधारणेच्या 10 दिवसांनंतर तिला चहा पित असताना विचित्र अनुभव आला आणि त्यावेळी तिचे ओठ सुन्न तसेच चेहऱ्याची डावी बाजू लटकत असल्याचं तिला जाणवलं. 

त्यावेळी, चहा प्यायल्यानंतर पीडितेच्या चेहऱ्याची एक बाजू लटकत असल्याचं जाणवल्याने तिला कदाचित अॅलर्जी किंवा स्ट्रोक झाल्याचं वाटलं. मात्र, डॉक्टरांकडे गेल्यानंतर याबद्दल सत्य समोर आलं. रुग्णालयात पोहोचल्यावर, पीडित महिलेला 'बेल्स पाल्सी' नावाचा आजार असल्याचं सांगण्यात आलं. 

पाच दिवसांपर्यंत स्टेरॉइड्स

एनएचएसने दिलेल्या माहितीनुसार, बेल्स पाल्सी हा एक असा आजार आहे, ज्यामध्ये तात्पुरती कमजोरी येऊन शरीराची हालचाल कमी होऊ शकते. यामुळे चेहऱ्याच्या एका बाजूवर गंभीर परिणाम होत असल्याची माहिती आहे. करीनाची ही शारीरिक समस्या दूर करण्यासाठी तिला जवळपास पाच दिवसांपर्यंत स्टेरॉइड्स देण्यात आले. 

मात्र, तरीसुद्धा पाणी पिताना तोंडातून पाणी बाहेर पडू नये यासाठी तिला ओठ घट्ट बांधावे लागतात आणि झोपताना डाव्या डोळ्यावर टेप म्हणजेच पट्टी बांधावी लागते, कारण ती तिच्या डोळ्याच्या पापण्या बंद करू शकत नाही. 

याबद्दल करीनाने सांगितलं की, "मी नुकतीच बाळंतपणातून बाहेर पडले होते आणि माझ्या शरीरावर पुन्हा प्रेम करायला शिकण्याचा प्रयत्न करत होते. परंतु याच काळात माझ्या चेहऱ्याची एक बाजू लकवा म्हणजेच अर्धांगवायू झाल्यासारखी जाणवते." 

हे ही वाचा: मुंबईची खबर: मेट्रो लाइन-3 च्या अंतिम टप्प्याचं उद्घाटन लवकरच... तारीख सुद्धा ठरली अन्... जाणून घ्या सविस्तर माहिती

अॅलर्जी किंवा स्ट्रोक असल्याचं वाटलं 

मुलीला जन्म दिल्याच्या 10 दिवसांनंतर ही शारीरिक समस्या उद्भवल्याचं करीनाने सांगितलं. ती म्हणाली की, "चहाचा कप घेतल्यानंतर मी सोफ्यावर गेले आणि माझ्या बाळाला स्तनपान करत होते तेव्हा माझे ओठ सुन्न होऊ लागले. मला त्यावेळी विचित्र अनुभव आला आणि ती अॅलर्जी असल्याचं मला वाटलं. परंतु, एका तासातच माझ्या चेहऱ्याची एक बाजू लटकत असल्याचं जाणवलं आणि तेव्हा मला स्ट्रोक आल्याचं वाटलं."

डोळ्यांसाठी ड्रॉप वापरते

याव्यतिरिक्त, करीनाने आपला चेहऱ्याला पॅरालाइज झाल्याचा व्हिडीओ सुद्धा टिकटॉक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केला आहे. ती म्हणाली की, "माझ्या डोळ्यांमध्ये अजूनही जळजळ होते आणि मी डोळ्यांसाठी ड्रॉप वापरते. मला रात्री झोपताना माझ्या डोळ्यांवर पट्टी बांधावी लागते, कारण माझ्या डाव्या डोळ्याची पापणी बंद होत नाही."

हे ही वाचा: Govt Job: 10 वी पास तरुणांनी मिळवा भारतीय तटरक्षक दलात नोकरी! कसा कराल अर्ज?

इतरांमध्ये जागरूकता

करिनाच्या मते, ती यातून नक्की बरी होणार असल्याचं डॉक्टरांनी तिला सांगितलं पण, यातून आपण कधीच बाहेर पडू शकणार नसल्याचं तिला मनातून वाटतं. तिच्या मनात या आजाराबद्दल भीती असूनही, ती दृढनिश्चयी आहे आणि तिच्या अनुभवाबद्दल ती इतरांमध्ये जागरूकता निर्माण करू इच्छिते. 

    follow whatsapp