मुंबईची खबर: मेट्रो लाइन-3 च्या अंतिम टप्प्याचं उद्घाटन लवकरच... तारीख सुद्धा ठरली अन्... जाणून घ्या सविस्तर माहिती

मुंबई तक

मुंबई मेट्रो लाइन-3 च्या बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित असलेल्या अंतिम टप्प्याचं उद्घाटन बुधवारी 8 ऑक्टोबर होणार असल्याचं वृत्त समोर आलं आहे.

ADVERTISEMENT

मेट्रो लाइन-3 च्या अंतिम टप्प्याचं उद्घाटन लवकरच...
मेट्रो लाइन-3 च्या अंतिम टप्प्याचं उद्घाटन लवकरच...
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मेट्रो लाइन-3 च्या अंतिम टप्प्याचं उद्घाटन लवकरच

point

तारीख सुद्धा ठरली...

Mumbai News: मुंबई मेट्रो लाइन-3 च्या बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित असलेल्या अंतिम टप्प्याचं उद्घाटन बुधवारी 8 ऑक्टोबर होणार असल्याचं वृत्त समोर आलं आहे. मेट्रो लाईन 3 चा हा अंतिम टप्पा शहरातील पहिला पूर्णत: भूमिगत मेट्रो कॉरिडॉर असेल. सायन्स म्युझियम स्टेशन ते कफ परेड स्टेशन पर्यंतच्या या शेवटच्या फेजमध्ये 11 भूमिगत स्थानके असतील. खरंतर, एक्वा लाइनचा पहिला टप्पा आरे आणि बीकेसी दरम्यान असून 2024 मध्ये या फेजचं उद्घाटन झालं होतं. त्यानंतर, 2025 मध्य आचार्य अत्रे चौकापर्यंत याचा विस्तार करण्यात आला. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एमएमआरसीएल) कडून बनवण्यात आलेल्या या मेट्रोचं एकूण कॉरिडोर 33.5  किमी लांब असून यामध्ये 26 स्टेशन्स असल्याची माहिती आहे. 

कधी झाली बांधकामाला सुरूवात? 

8 वर्षांहून अधिक काळापासून मेट्रो-3 लाइनचं बांधकाम सुरू आहे. 2017 मध्ये लाइनच्या बांधकामाला सुरूवात झाली होती. खरंतर, टेक्निकल आणि पर्यावरणीय अडथळे तसेच प्रशासकीय आव्हानांमुळे मेट्रो लाइनचं काम पूर्ण होण्यास अधिक काळ लागला. यातील महत्त्वाची बाब म्हणजे, सीएसएमटी स्थानकासारख्या कोणत्याही वारसा स्थळाला नुकसान न पोहोचवता संवेदनशील बांधकाम टेक्निक्सचा वापर करून मेट्रो मार्गिकेची निर्मिती करण्यात आली. यासाठी जवळपास 37,276 कोटी रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती आहे. 

हे ही वाचा: Govt Job: 10 वी पास तरुणांनी मिळवा भारतीय तटरक्षक दलात नोकरी! कसा कराल अर्ज?

पावसाळ्यात थांबलं काम 

आसपासचे निवासी परिसर, पर्यावरणवादी आणि त्यासंबंधीचे खटले यामुळे मेट्रो मार्गाच्या बांधकामाला बराच वेळ लागला. जवळच्या क्षेत्रातील जुन्या इमारती संवेदनशील असल्याकारणाने रहिवाशांकडून मेट्रो मार्गिकेला बऱ्याचदा विरोध व्हायचा आणि मुंबईतील पावसाळ्यात कामाच्या ठिकाणी भरपूर पाणी साचल्याने याचं काम सुद्धा थांबवण्यात येत होतं. 

हे ही वाचा: 'चार खर्च कमी करावे लागले तरी चालेल पण...', CM फडणवीस असं म्हणाले अन् केली प्रचंड मोठी घोषणा

कोणती प्रमुख स्थानके असतील? 

मुंबई मेट्रो लाइन 3 च्या इतर भागांमध्ये विज्ञान संग्रहालय, महालक्ष्मी, मुंबई सेंट्रल, ग्रॅन्ट रोड, गिरगाव, कालबादेवी, सीएसएमटी, हुतात्मा चौक, चर्चगेट, विधान भवन आणि कफ परेड यांसारखी स्थानके आहेत. मेट्रो लाइनचा हा टप्पा मुंबईच्या प्रमुख विभागांना जोडत असल्याचं सांगण्यात येत आहे. अशाप्रकारे, या अॅक्वा लाइनमुळे प्रवाशांना खूपच फायदा होणार असून प्रवासाचा वेळ सुद्धा कमी होणार असल्याचं सांगितलं जात आहे. याव्यतिरिक्त, या मेट्रो लाइनचा मुंबईच्या वाहतूक कोंडीवर मोठी परिणाम होणार असून यामुळे मेट्रो ट्रॅफिकची गर्दी कमी करण्यासाठी मदत होणार आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp