Govt Job: 10 वी पास तरुणांनी मिळवा भारतीय तटरक्षक दलात नोकरी! कसा कराल अर्ज?

मुंबई तक

भारतीय तटरक्षक दल (इंडियन कोस्ट गार्ड) कडून मोटर ट्रान्सपोर्ट आणि मल्टी टास्किंग स्टाफ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

भारतीय तटरक्षक दलात भरती...
भारतीय तटरक्षक दलात भरती...
social share
google news

बातम्या हायलाइट

point

10 वी पास तरुणांसाठी सैन्यात सहभागी होण्याची संधी

point

भारतीय तटरक्षक दलाकडून मोठी भरती

point

कसा कराल अर्ज?

Govt Job: 10 वी उत्तीर्ण तरुणांसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. भारतीय तटरक्षक दल (इंडियन कोस्ट गार्ड) कडून मोटर ट्रान्सपोर्ट आणि मल्टी टास्किंग स्टाफ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्जाची प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवार 11 नोव्हेंबर 2025 पर्यंत अर्ज करू शकतात. 

उमेदवारांना इंडियन कोस्ट गार्डमध्ये भरती होण्याची ही चांगली संधी उपलब्ध झाली असून या भरतीच्या माध्यमातून मोटर ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर, मल्टी टास्किंग स्टाफमध्ये प्यून, पॅकर आणि ड्राफ्टी या पदांसाठी नियुक्ती केली जाणार आहे. 

काय आहे पात्रता? 

या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी उत्तीर्ण असणं अनिवार्य आहे. तसेच, उमेदवारांकडे मोटर ट्रान्सपोर्ट पदासाठी हॅव्ही आणि लाइट मोटर वाहनाचं वैध ड्रायव्हिंग लायसन्स आणि त्यांना ड्रायव्हिंग मोटर वाहन चालवण्याचा 2 वर्षांचा अनुभव असणं गरजेचं आहे. इतर पदांवर सुद्धा भरती होण्यासाठी संबंधित क्षेत्रात 2 वर्षांचा अनुभव ग्राह्य धरण्यात येणार आहे. याशिवाय, लास्कर फर्स्ट क्लास पदासाठी बोटीत 3 वर्षांची सर्व्हिस असणं आवश्यक आहे. या भरतीसंदर्भात अधिक माहिती मिळवण्यासाठी उमेदवार भरतीचं अधिकृत नोटिफिकेशन तपासू शकतात. 

हे ही वाचा: घरात घुसून महिलेवर थेट बलात्कार... पण, वाचण्यासाठी पीडितेने दिली चकित करणारी ऑफर! CCTV मध्ये सगळं कैद

वयोमर्यादा

मोटर व्हेहिकल ड्रायव्हर आणि मल्टी टास्किंग स्टाफ पदांसाठी 18 ते 27 वर्षे वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. तसेच, लास्कर पदांसाठी उमेदवारांचं कमाल वय 30 वर्षे असणं अनिवार्य आहे. याशिवाय, सरकारी नियमांनुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सूट देण्यात येणार आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp