Pune News : ग्रामीण पुण्यातील शिरूर तालुक्यात मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. एका साडे पाच वर्षांच्या चिमुरडीवर बिबट्यांना हल्ला केला आणि त्या हल्ल्यात चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना आज 12 ऑक्टोबर रोजी रविवारी सकाळी पाऊणे दहा वाजताच्या सुमारास पिंपरखेड येथे घडली आहे. या घटनेनं शिरूर तालुका हादरून गेला आहे. या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. मृत मुलीचं नाव शिवन्या बोंबे असल्याचे समजते.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : बीड हादरलं! सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या कुटुंबावर प्राणघातक हल्ला, 15 जणांनी महिलांवर धारधार कोयत्याने रक्तबंबाळ होईपर्यंत...
बिपट्याने मुलीला तोंडात पकडले आणि...
शिवन्या ही आपले आजोबा अरुण यांना पिण्यासाठी पाणी घेऊन जात होती. तेव्हा घराच्या जवळ असलेल्या चार फुट उंचीच्या उसाच्या शेतात एक बिबट्या दबा धरून होता. शिवन्या पाणी घेऊन जात असताना, तिच्यावर झडप घातली. त्यानंतर बिपट्याने मुलीला तोंडात पकडले आणि तो उसाच्या शेतात शिरला.
आजोबांनी पाहिला घटनेचा थरार
200 मीटर अंतरावर आजोबा बसले असता, त्यांनी हा घडलेला धक्कादायक थरार पाहिला होता. आपल्या चिमुकल्या नातीवर बिबट्याने हल्ला केल्याचे पाहताच, क्षणाचाही विलंब न करताच आजोबांनी बिपट्याच्या दिशेनं धाव घेतली. तेव्हा बिपट्याने केलेल्या हल्ल्यात शिवन्याला तिच्या आजोबांनी सोडवलं. शिवन्या गंभीर जखमी होती,त्यानंतर तिला एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, उपचारादरम्यान शिवन्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
हे ही वाचा : छत्रपती संभाजीनगर! शाळेतून घरी परतताना दोन वर्गमित्र पोहायला गेले, बॅग आणि कपडे काठावर ठेवले, नंतर दोघांनी उडी घेतली अन्...
संबंधित घटनेची माहिती इतरांना मिळताच परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली. बोंबे कुटुंबियावर या घटनेनं दु:खाचा डोंगर कोसळला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील,माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी देखील उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली.आणि बोंबे कुटुंबाचे सांत्वन केले तसेच प्रशासनालाही सूचना दिल्या. याच परिसरात हल्ला होऊन मनुष्य हानी झाल्याची ही सातवी घटना असल्याचं सांगण्यात येत आहे.
ADVERTISEMENT
