Beed Crime : बीडमध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीत वाढ होताना दिसते. भाजप आमदार सुरेश धस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सतीश भोसले उर्फ खोक्याच्या कुटुंबावर मध्यरात्री काही अज्ञात टोळक्यांनी हल्ला केला. ही घटना बीड जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील कासार शहराजवळ घडली आहे. या घटनेनं शिरुर बीड पुन्हा एकदा हादरून गेला. या घटनेत एकूण चार महिलांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. यातील एक महिला गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे. या धक्कादायक प्रकारात खोक्या भोसलेची पत्नी तेजू भोसलेनं आपबीती सांगितली. तसेच खोक्याच्या मेहुणीला देखील उचलून नेल्याचं सांगितलं.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : बीड हादरलं! सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या कुटुंबावर प्राणघातक हल्ला, 15 जणांनी महिलांवर धारधार कोयत्याने रक्तबंबाळ होईपर्यंत...
खोक्याच्या कुटुंबावर रात्री उशिरा 15 जणांनी हल्ला केल्याचं सांगण्यात येत आहे. ही घटना बीड जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील तहसील कार्यालयाजवळील गायरान वस्तीत घडल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर पीडित महिलेनं आम्हाला न्याय हवा असल्याची सरकारकडे मागणी केली आहे.
रात्री नेमकं काय घडलं?
खोक्या भोसलेची बायको तेजू भोसलेनं घडलेला एकूण प्रकार सांगितला की, 'रात्री 10-11 वाजताच्य़ा सुमारास आमच्यावर हल्ला करण्यात आला. त्याचदरम्यान, एक स्कॉर्पिओ आणि एक स्विफ्ट आली. गाडीतून 15 ते 20 लोक घटनास्थळी दाखल झाले होते. पारध्यांनो तुम्ही इथं कशाला राहिला असं म्हणत मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाण करताना त्यांनी माझ्या लहान बहिणीचा हात ओढला आणि तिला ओढत नेले. मी वाचवण्यासाठी गेले तर डोक्यातच कुऱ्हाड टाकली. त्यानंतर मी तशीच पोलीस ठाण्यात गेले, पण पोलिसांनी माझी मदत केली नाही', असं पीडितेनं सांगितलं.
हे ही वाचा : पुणे : बिबट्या शेतात दबा धरून होता, मुलीला पाहताच बिपट्याने घेतली झडप, नंतर आजोबांच्या डोळ्यादेखतच थरार...
हल्लेखोरांच्या हातात कोयते, कुऱ्हाडी होत्या असं पीडितांनी आपल्यावरील आपबीती सांगितली. दरम्यान, महिलांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु असल्याचं सांगण्यात येत आहे. मारहाण करणारे कोण आहेत? याबाबतची माहिती समोर आली नाही. या प्रकरणाचा शिरुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
