आंबे खायला देण्याच्या बहाण्याने नेलं घरी! 75 वर्षीय आजोबाने नातीसोबतच...

लखनऊच्या बंथरा शहरात एका 75 वर्षीय वृद्ध व्यक्तीने आपल्याच 6 वर्षीय अल्पवयीन नातीवर बलात्कार केल्याची संताजनक बातमी समोर आली आहे.

75 वर्षीय आजोबाने नातीसोबतच केलं घाणेरडं कृत्य (फोटो सौजन्य: Grok AI)

75 वर्षीय आजोबाने नातीसोबतच केलं घाणेरडं कृत्य (फोटो सौजन्य: Grok AI)

मुंबई तक

• 03:21 PM • 14 Jun 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

आजोबाने नातीसोबतच केलं घाणेरडं कृत्य

point

आजोबा आणि नातीच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना

point

लखनऊमधील संतापजनक घटना

Lucknow News: आजोबा आणि नातीचं नातं हे खूपच गोड आणि पवित्र मानलं जातं. परंतु याच नात्याला काळीमा फासणारी एक घटना घडल्याचं समोर आलं आहे. शुक्रवारी (13 मे) लखनऊच्या बंथरा शहरात घडलेल्या या खळबळजनक घटनेमुळे संपूर्ण परिसरच हादरला आहे. एका 75 वर्षीय वृद्ध व्यक्तीने आपल्याच 6 वर्षीय अल्पवयीन नातीवर बलात्कार केला. 

हे वाचलं का?

नेमकी घटना काय? 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्यादिवशी ही घटना घडली त्या दिवशी पीडित मुलीचे वडील कामानिमित्त बाहेर गेले होते आणि तिची आई सुद्धा नातेवाईकांना भेटण्यासाठी गेली होती. पीडित मुलगी दुसऱ्या इयत्तेत शिकत होती आणि त्या दिवशी तिच्यासोबत तिची चार वर्षांची बहीण आणि अडीच वर्षांचा लहान भाऊ घरी होता. दुपारी 2:30 वाजताच्या सुमारास, तिचा आजोबा तिच्या घरी आला. त्यावेळी त्याने आपल्या 6 वर्षांच्या लहान नातीला आंबा खायला देण्याचं आमिश दाखवलं तसेच तिला 20 रुपये देऊन आपल्या जुन्या घरी घेऊन आला. त्याचं ते घर मुलीच्या घराहून 100 मीटर अंतरावर होतं. त्या घरातच त्याने आपल्या अल्पवयीन नातीवर बलात्कार केला. 

हे ही वाचा: नेत्यासोबत भररस्त्यात शारीरिक संबंध, व्हायरल व्हिडिओमधील महिलेचे कॉल डिटेल्स पोलिसांच्या हाती!

रडत रडत आईला सांगितला सर्व प्रकार

संध्याकाळी आई घरी परत आल्यानंतर त्या लहान मुलीने रडत रडत तिच्यावर झालेला सगळा प्रसंग सांगितला. सुरुवातीला काही गावकऱ्यांनी त्या मुलीच्या आईला या प्रकरणाकडे दुर्लक्ष करण्याचा सल्ला दिला, परंतु गावातील काही सुशिक्षित लोकांच्या सल्ल्यानुसार आईने धाडस केले आणि शुक्रवारी तिने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.

हे ही वाचा: मुंबईची खबर: Veg आणि Non Veg एकाच किचनमध्ये बनवणाऱ्या हॉटेल मालकांची लागणार वाट!

पोलिसांनी काय सांगितलं?

बंथरा पोलिस स्टेशनचे प्रभारी राणा राजेश सिंह यांच्या म्हणण्यानुसार, त्या वद्ध व्यक्तीवर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि पोलिस पथके अल्पवयीन मुलीसोबत घाणेरडं कृत्य करणाऱ्या त्या नराधमाच्या शोधात छापे टाकत आहेत. पोलिसांनी आरोपीला लवकरात लवकर पकडण्याचे आश्वासन दिले आहे.

    follow whatsapp