Maharashtra Board HSC Results 2025 : सर्वात मोठी अपडेट! बारावीच्या निकालाची तारीख आली समोर, निकाल कुठे पाहाल?

Maharashtra Board HSC Results 2025 : सर्वात मोठी अपडेट! बारावीच्या निकालाची तारीख आली समोर, निकाल कुठे पाहाल? महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख आणि वेळ अधिकृतपणे घोषित करण्यात आली आहे.

Maharashtra Board Hsc Result 2025 Latest News

Maharashtra Board Hsc Result 2025 Latest News

मुंबई तक

04 May 2025 (अपडेटेड: 04 May 2025, 05:01 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

बारावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी 5 मे रोजी जाहीर होणार

point

निकाल कुठे आणि कसा पाहाल?

point

उद्या दुपारी 1 वाजता पाहा बारावीचा निकाल

Maharashtra Board HSC Results 2025 :महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख आणि वेळ अधिकृतपणे घोषित करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (MSBSHSE) उद्या सोमवारी 5 मे 2025 रोजी एचएससी म्हणजेच बारावीचा निकाल जाहीर केला जाणार आहे.

हे वाचलं का?

बोर्डाने त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर याबाबत माहिती दिली आहे. महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट https://www.mahahsscboard.in/  वर दिलेल्या माहितीनुसार, 12 वी चा रिझल्ट 5 मे रोजी दुपारी 1 वाजता जाहीर केला जाणार आहे. निकाल घोषित केल्यानंतर विद्यार्थी अधिकृत वेबसाईट्स mahresult.nic.in आणि  mahahsscboard.in वर ऑनलाईन मार्कशिट चेक करू शकता. 

बारावीच्या परीक्षेचा निकाल उद्या सोमवारी ऑनलाईन जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या रोल नंबरची आवश्यकता लागणार आहे. विद्यार्थ्यांसाठी रोल नंबर ऑनलाईन जाहीर केले, तर ते कसे डाऊनलोड करायचे, असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. दरम्यान, बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केलेले विद्यार्थी अधिकृत वेबसाईटवर mh-hsc.ac.in माहिती भरू शकतात आणि त्यानंतर आपला रोल नंबर डाऊनलोड करू शकतात. 

हे ही वाचा >> Maharashtra Board HSC Results 2025 : सर्वात मोठी अपडेट! बारावीच्या निकालाची तारीख आली समोर, निकाल कुठे पाहाल?

कशी असेल ग्रेडिंग सिस्टम?

    follow whatsapp