कोल्हापूर : अल्पवयीन मुलीच्या पोटात दुखू लागलं अन्...,भयानक प्रकार उघड

एका 17 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला लग्नाचं आमिष दाखवून पळवून नेलं आणि तिचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी चौघा जणांवर पेठवडगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय.

Kolhapur Crime

Kolhapur Crime

मुंबई तक

• 08:16 AM • 21 May 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

कोल्हापूर : अल्पवयीन मुलीच्या पोटात दुखू लागलं अन्...,

point

भयानक प्रकार उघड

Kolhapur Crime, दीपक सूर्यवंशी : कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील पेठवडगांव पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. एका 17 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला लग्नाचं आमिष दाखवून पळवून नेलं आणि तिचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी चौघा जणांवर पेठवडगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. पीडित मुलगी गरोदर राहिल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय.

हे वाचलं का?

लग्नाचं अमिष दाखवून घरातून पळवून नेलं

हातकणंगले तालुक्यातील पेठवडगांव इथल्या एका 17 वर्षीय मुलीशी, यश जगदीश कांबळे या तरूणानं प्रेमसंबंध प्रस्थापित केले. तिचं वय कमी आहे, हे माहिती असतानाही आरोपी यशनं तिला लग्नाचं आमिष दाखवून मार्च 2025 मध्ये तिला घरातून पळवून नेलं. त्यानंतर त्यानं सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील नागराळे इथं त्या मुलीला नेऊन तिचं लैंगिक शोषण केलं.

हे ही वाचा : Personal Finance: 'नो-कॉस्ट EMI' अजिबात नाही मोफत, खरेदीपूर्वी लक्षात ठेवा नाहीतर होईल मोठी गडबड

चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

या सर्व प्रकारात यश कांबळेचे  नातेवाईक आणि अन्य काही मित्रांनी दोघांनाही आश्रय दिला होता. दरम्यान, ग्रामपंचायत अधिकारी वासंती कुलकर्णी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पेठवडगांव पोलिसांनी, संशयित आरोपी यश जगदीश कांबळे याच्यासह संदिप जाधव, दिपाली सुहास जाधव, रेखा आप्पांसो जाधव यांच्यावर गुन्हा दाखल केलाय.

हे ही वाचा : Maharashtra Weather : सूर्यदेव कोपणार, 'या' जिल्ह्यांना उष्णतेचा रेड अलर्ट, तर इथे वादळाचं संकट

पीडिता गरोदर असल्याचं उघड

पीडित अल्पवयीन मुलीच्या पोटात दुखू लागल्यानं तिला आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं. त्यावेळी ती गरोदर असल्याचं उघड झालं. बालविवाह आणि लैंगिक शोषणाच्या या गंभीर प्रकारामुळं पेठवडगांव परिसरात खळबळ उडाली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिता पवार या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.